दीपिका पादुकोण अन् प्रियंका चोपडा ठरल्या सर्वाधिक कमाई करणाºया अभिनेत्री!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 05:29 PM2017-08-31T17:29:31+5:302017-08-31T22:59:31+5:30
फोर्ब्स साप्ताहिकाच्या २०१७ मध्ये सर्वाधिक कमाई करणाºया टॉप १० बॉलिवूड कलाकारांमध्ये केवळ दोनच अभिनेत्रींनी स्थान मिळविले. दीपिका पादुकोण आणि ...
फ र्ब्स साप्ताहिकाच्या २०१७ मध्ये सर्वाधिक कमाई करणाºया टॉप १० बॉलिवूड कलाकारांमध्ये केवळ दोनच अभिनेत्रींनी स्थान मिळविले. दीपिका पादुकोण आणि प्रियंका चोपडा अशी त्यांची नावे असून, या दोघींनी बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि खिलाडी अक्षयकुमारला कमाईच्या बाबतीत पिछाडीवर टाकले आहे. या यादीत बॉलिवूडचा किंग शाहरूख खान पहिल्या स्थानावर आहे. तर १.१० कोटी डॉलरच्या कमाईसह दीपिका पादुकोण सहाव्या स्थानावर आहे. त्याचबरोबर प्रियंका चोपडा आणि दीपिकाचा बॉयफ्रेंड रणवीर सिंग एक कोटी डॉलरच्या कमाईसह संयुक्तपणे सातव्या स्थानावर आहेत.
दीपिका आणि प्रियंका बॉलिवूडमधील आघाडींच्या नायिका आहेत. फोर्ब्स डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, शाहरूखने त्याचा समकालीन अभिनेता सलमान खान, अक्षयकुमार आणि आमीर खानला कमाईच्या बाबतीत पिछाडीवर टाकले आहे. वास्तविक शाहरूखच्या ‘फॅन, दिलवाले, जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर फारसा करिष्मा दाखविला नव्हता. शाहरूखने जाहिरात आणि त्याच्या रेड चिलीज एंटरटेन्मेंटच्या यशस्वी प्रोजेक्टच्या मदतीने १ जून २०१६ ते १ जून २०१७ दरम्यान ३.८ कोटी डॉलरची कमाई केली.
सलमान शाहरूखच्या तुलनेत फारसा मागे नाही. कारण तो या यादीत ३.७ कोटी डॉलरच्या कमाईसह दुसºया स्थानावर आहे. सलमानला जाहिरातीबरोबर ‘सुलतान’च्या ब्लॉकबस्टरचा फायदा झाला. खाननंतर या यादीत राष्टÑीय पुरस्कार विजेता अक्षयकुमारला स्थान मिळाले आहे. खिलाडी ३.५५ कोटी डॉलरच्या कमाईसह तिसºया स्थानावर आहे. अक्षयचे बरेचसे चित्रपट हिट ठरले आहेत. त्यामध्ये ‘जॉली एलएलबी-२’, ‘नाम शबाना’ आणि नुकताच रिलीज झालेल्या ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटांचा समावेश आहे.
‘दंगल’च्या अभूतपूर्व यशानंतर आमीर १.२५ कोटी डॉलरच्या कमाईसह चौथ्या स्थानावर आहे. अभिनेता हृतिक रोशन १.१५ कोटी डॉलरच्या कमाईसह पाचव्या स्थानावर आहे. २०१६ मध्ये आलेल्या ‘मोहेनजोदारो’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर फारसा करिष्मा दाखविला नव्हता, परंतु २०१७ मध्ये आलेल्या ‘काबिल’ या चित्रपटातून त्याने वापसी केली आहे. फोर्ब्सनुसार मेगास्टार अमिताभ बच्चन ९० लाख डॉलर आणि रणबीर कपूर ८५ लाख डॉलरच्या कमाईसह नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत.
हे कमाईचे आकडे बॉक्स आॅफिस इंडिया, बॉक्स आॅफिस मोजो आणि आयएमडीबीच्या आकड्यांसह उद्योग क्षेत्रावर आधारित आहेत. या यादीत मिळालेल्या दहाही सेलिब्रिटींनी १ जून २०१६ ते १ जून २०१७ दरम्यान १८.३ कोटी डॉलरची कमाई केली आहे. शाहरूख, सलमान आणि अक्षयला फोर्ब्स साप्ताहिकाच्या जगातील सर्वाधिक कमाई करणाºया अभिनेत्यांमध्ये अनुक्रमे आठवे, नववे आणि दहावे स्थान मिळाले होते.