'कॉकटेल २'मधून दीपिका पादुकोण आणि सैफ अली खानचा पत्ता कट, दिसणार ही फ्रेश जोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 20:29 IST2024-12-18T20:27:57+5:302024-12-18T20:29:45+5:30

Cocktail 2 Movie : 'कॉकटेल २' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी या चित्रपटात पूर्णपणे नवीन स्टारकास्ट दिसणार आहे.

Deepika Padukone and Saif Ali Khan's has been cut from 'Cocktail 2', this fresh pair will be seen | 'कॉकटेल २'मधून दीपिका पादुकोण आणि सैफ अली खानचा पत्ता कट, दिसणार ही फ्रेश जोडी

'कॉकटेल २'मधून दीपिका पादुकोण आणि सैफ अली खानचा पत्ता कट, दिसणार ही फ्रेश जोडी

२०१२ मध्ये 'कॉकटेल (Cocktail 2 Movie ) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात दीपिका पादुकोण, सैफ अली खान आणि डायना पेंटी मुख्य भूमिकेत दिसले होते. मित्रांवर आधारित या चित्रपटाची कथा चाहत्यांना खूप आवडली. दिनेश विजानचे कॉकटेल देखील दीपिका पादुकोणच्या कारकिर्दीत गेम चेंजर ठरला. 
'कॉकटेल २' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी या चित्रपटात पूर्णपणे नवीन स्टारकास्ट दिसणार आहे. या चित्रपटासाठी दिनेश विजान आणि लव रंजन एकत्र येणार असल्याची बातमी आहे. 

सध्या शाहिद कपूर आणि क्रिती सनॉन यासाठी फायनल झाले आहेत. आता तिसऱ्या लीड अभिनेत्रीचे नावही समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुष्पा २ची अभिनेत्री रश्मिका मंदाना हिला यासाठी संपर्क करण्यात आला आहे. रश्मिका मंदाना आणि शाहिद कपूर एका प्रोजेक्टवर एकत्र काम करणार असल्याची चर्चा खूप दिवसांपासून समोर येत होती, आता तो चित्रपट कॉकटेल असणार असल्याचे दिसत आहे.

शाहिद- रश्मिका दिसणार पहिल्यांदाच एकत्र
याआधी ते २०२३ मध्ये अनीस बज्मीच्या कॉमेडी ड्रामामध्ये काम करणार होते पण चर्चा काही झाली नाही. आता कॉकटेल २मध्ये दोघांची फ्रेश जोडी पाहणे आनंददायी ठरेल. दुसरीकडे, क्रिती सनॉन आणि शाहिद कपूर यांनी तेरी बातों में ऐसा उलझा जियामध्ये एकत्र काम केले आहे. त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली. मात्र, रश्मिकाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

लव रंजन यांनी लिहिली चित्रपटाची कथा
या चित्रपटाचे लेखन लव रंजन यांनी केले असून होमी अदजानिया दिग्दर्शित करणार आहेत. कॉकटेल २ची स्क्रिप्ट तयार आहे. विनोदासह मैत्रीची उत्कृष्ट कथा चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. चित्रपटात लव्ह ट्रँगल पाहायला मिळणार आहे. स्टारकास्ट आणि रिलीजच्या तारखेबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

Web Title: Deepika Padukone and Saif Ali Khan's has been cut from 'Cocktail 2', this fresh pair will be seen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.