गरोदर असलेली दीपिका पहिल्यांदाच आली कॅमेरासमोर, केलं असं काही की... Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 09:58 IST2024-05-09T09:57:56+5:302024-05-09T09:58:56+5:30
दीपिका पदुकोनचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ व्हायरल झालाय.(deepika padukone)

गरोदर असलेली दीपिका पहिल्यांदाच आली कॅमेरासमोर, केलं असं काही की... Video व्हायरल
दीपिका पदुकोन ही बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री. दीपिकाला आपण विविध माध्यमांत अभिनय करताना पाहिलंय. दीपिका तशी कोणत्याही वादात सापडत नाही. याशिवाय ती पापाराझींसोबत सुद्धा हसतखेळत असते. दीपिकाचा सध्या प्रेग्नेंसी पीरियड एन्जॉय करत आहे. नुकताच दीपिकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत तिला शूट करणाऱ्या व्यक्तीच्या कॅमेरावर धक्का मारून निघून जाताना दिसते. नेमकं काय झालं?
व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं की, कारमधून खाली उतरल्यानंतर दीपिका एअरपोर्टच्या दिशेने जाताना दिसली. ती गाडीतून उतरते तेव्हा कॅमेराकडे पाहते. पुढे जेव्हा ती कॅमेरासमोर येते तेव्हा ती हाताने धक्का मारून निघून जाते. त्यामुळे कॅमेरा खाली पडलेला दिसतो. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून या व्हिडिओवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. पण दीपिकाने हे सर्व रागात केलं नसून मस्करीमध्ये दीपिकाने त्याचा कॅमेरा ओढल्याचं स्पष्ट झालंय.
काही दिवसांपूर्वी रणवीर - दीपिकाचे व्हेकेशनचे फोटो व्हायरल झाले होते. यात दीपिका रणवीर सिंगसोबत तिचा बेबीमून एन्जॉय करत असल्याचे शेअर केले जात होते. दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर.. ती लवकरच 'कल्की' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात दीपिकासोबत प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हासन हे कलाकार झळकणार आहेत. हा सिनेमा जून २०२४ मध्ये रिलीज होणार आहे.