कॉन्ट्रोव्हर्सीचा फायदाच झाला ना राव...! दहाच दिवसांत ‘बेशरम रंग’ गाण्याला मिळाले इतके मिलियन व्ह्युज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 01:48 PM2022-12-22T13:48:57+5:302022-12-22T13:50:02+5:30
Besharam Rang Controversy : ‘बेशरम रंग’ हे गाणं रिलीज झालं आणि या गाण्यानं वाद ओढवून घेतला.
Besharam Rang Controversy : बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान (Shah Rukh Khan) याचा ‘पठाण’ ( Pathaan) हा सिनेमा वेगवेगळ्या कारणानं चर्चेत आहे. पण सर्वाधिक चर्चा आहे ती या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्याची. ‘बेशरम रंग’ हे गाणं रिलीज झालं आणि या गाण्यानं वाद ओढवून घेतला. दीपिका पादुकोणने (Deepika Padukone) गाण्यात भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली आणि हिंदू संघटना याविरोधात रस्त्यावर उतरल्या. हा हिंदू धर्माचा अपमान आहे, असं सांगत या संघटनांनी शाहरूखच्या ‘पठाण’वर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं. पण या वादाचा ‘बेशरम रंग’ला फायदाच झाला. होय, एकीकडे या गाण्यावरून कॉन्ट्रोव्हर्सी सुरू आहे आणि दुसरीकडे ‘बेशरम रंग’ने 100 मिलियन व्ह्युजचा टप्पा पार केला आहे.
होय, अवघ्या दहा दिवसांतच या गाण्याला युट्यूबवर 100 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. रिलीजच्या 10 दिवसानंतरही हे गाणं युट्युबवर नंबर 1 वर ट्रेंड करत आहे. इतकंच नाही तर या गाण्यानं सलमान खानच्या ‘राधे’मधील गाण्याचा विक्रमही मोडीस काढला आहे. ‘राधे’च्या ‘सीटी मार’ या गाण्याला 11 दिवसांत 100 मिलियन व्ह्युज मिळाले होते. ‘बेशरम रंग’ने दहाच दिवसांत 100 मिलियनचा आकडा गाठला.
#BesharamRang completes 100M views in 9 days 23 hours making it the Fastest Hindi song to reach 100M views ♥️
— Shah Rukh Khan Warriors FAN Club (@TeamSRKWarriors) December 22, 2022
The King is Back 🔥#JhoomeJoPathaan#Pathaan#ShahRukhKhan#DeepikaPadukone#JohnAbraham#YRF50pic.twitter.com/1FwkDanILz
धनुषचं ‘व्हाय दिज कोलावरी डी’ हे 100 मिलियन व्ह्युज मिळवणारं पहिलं हिंदी गाणं होतं. व्हाय दिज कोलावरी डी आणि सीटी मार या दोन गाण्यानंतर ‘बेशरम रंग’ हे कमी वेळात 100 मिलियन व्ह्युज मिळवणारं तिसरं गाणं ठरलं आहे. एकंदर काय तर ‘बेशरम रंग’च्या कॉन्ट्रोव्हर्सीचा दीपिकाच्या गाण्याला फायदाच झाला आहे.
‘पठाण’ या चित्रपटात शाहरुख खान व दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 25 जानेवारी 2023ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुख तब्बल चार वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.