दीपिका पादुकोण बर्थडे स्पेशल : ‘हॉट अॅण्ड सेक्सी’ फोटोशूटची एक सफर...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2017 11:20 AM2017-01-05T11:20:57+5:302017-01-05T11:20:57+5:30
तरूणपणी बॅडमिंटनपटू बनण्याचे स्वप्न दीपिकाने उराशी बांधले होते. पण, मॉडेलिंगमुळे तिचे क्रीडा क्षेत्रातील करिअर बाजूला सारावे लागले. ‘ओम शांती ओम’,‘कॉक टेल‘,‘ये जवानी हैं दिवानी‘,‘चेन्नई एक्सप्रेस’ यासारख्या अनेक हिंदी चित्रपटातून दीपिका पादुकोण हिने वेगवेगळया भूमिका साकारल्या.
स ्वांत जास्त फी आकारणाऱ्या सध्याच्या अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे दीपिका प्रकाश पादुकोण. अर्थात तुमची-आमची लाडकी ‘डिप्पी’. तरूणपणी बॅडमिंटनपटू बनण्याचे स्वप्न दीपिकाने उराशी बांधले होते. पण, मॉडेलिंगमुळे तिचे क्रीडा क्षेत्रातील करिअर बाजूला सारावे लागले. ‘ओम शांती ओम’,‘कॉक टेल‘,‘ये जवानी हैं दिवानी‘,‘चेन्नई एक्सप्रेस’ यासारख्या अनेक हिंदी चित्रपटातून दीपिका पादुकोण हिने वेगवेगळया भूमिका साकारल्या. आव्हानं स्वीकारायला तिला प्रचंड आवडत असल्याने तिने हॉलिवूडपट ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ झांडर केज’ सारख्या चित्रपटात डेब्यू करण्याचा निर्णय घेतला. हॉलिवूडच्या अॅक्शनपटात आता ही ‘हॉट’ अभिनेत्री दिसणार आहे म्हटल्यावर तिने आत्तापर्यंत केलेल्या ‘हॉट अॅण्ड सेक्सी’ फोटोशूटची एक सफर तिच्या वाढदिवसानिमित्त करूयात...तिला वाढदिवसानिमित्त ‘सीएनएक्स मस्ती टीम’ कडून खूप खूप शुभेच्छा...
स्वप्नाच्या दिशेने...
बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांची मुलगी दीपिका हिचा जन्म कोपनहेगन येथे झाला. बंगळुरु येथे तिने तिचे शिक्षण आणि बॅडमिंटनवरील प्रेम संपादित केले. किशोरवयीन वयात असताना ती राष्ट्रीय पातळीपर्यंत खेळली. मात्र, मॉडेल होण्याचा मार्ग स्वीकारल्याने तिला बॅडमिंटनपटू होण्याच्या स्वप्नावर पाणी सोडावे लागले. मॉडेल झाल्यानंतर तिला चित्रपटांच्या आॅफर्स मिळू लागल्या. २००६ मध्ये तिला कन्नड चित्रपट ‘ऐश्वर्या’ची आॅफर मिळाली. मात्र, बॉलिवूडमध्ये तिचा डेब्यू चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘ओम शांती ओम’ हा मानला जातो. या चित्रपटासाठी तिला ‘बेस्ट फिमेल डेब्यू’ या कॅटेगरीत ‘फिल्मफेअर अॅवॉर्ड’ मिळाला.
भूमिकांचे ‘ती’ने केले सोने...
‘ओम शांती ओम’ साठी पुरस्कार मिळाल्यानंतर तिच्या आत्मविश्वासात भर पडली. तिला आॅफर्स मिळत गेल्या अन् ती देखील चित्रपटांमध्ये बिनधास्त भूमिका करत गेली. ‘लव्ह आज कल‘,‘बचना ए हसीनों’,‘हाऊसफुल्ल‘,‘कॉकटेल‘,‘ये जवानी हैं दिवानी‘,‘चेन्नई एक्सप्रेस‘,‘गोलियों की रासलीला - रामलीला‘,‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्या. ‘पिकू’ चित्रपटातून तिने उत्कृष्ट मुलीची भूमिका साकारली. या चित्रपटानंतर बिग बी अमिताभ बच्चन हे म्हणाले,‘दीपिकाची जर इच्छा असेल तर मी तिच्यासोबत पुन्हा एकदा काम करू इच्छितो.’ यावरूनच दीपिकाच्या उत्कृष्ट अभिनयाची कल्पना येते.
‘हॉट अॅण्ड ग्लॅमरस’ जगाकडे वाटचाल...
एखाद्या कलाकारासाठी ते अभिनय कसा करतात? यापेक्षाही ते किती व्हर्साटाईल आहेत हे जास्त महत्त्वाचं असतं. दीपिकाने उत्कृष्ट भूमिका तर साकारल्याच पण, वेगवेगळ्या ब्रँडेड मॅगेझिनसाठी हॉट फोटोशूट देखील केलं. गंभीर आणि समंजस भूमिका करणाऱ्या या अभिनेत्रीमधून ग्लॅमरस व्यक्तिमत्वाची दीपिका सर्वांसमोर आली. ती एक उत्तम मॉडेल झाल्यानंतर तिची चित्रपटांमधील डिमांडही वाढली. मॅगेझिन फोटोशूटसह तिने काही इतर जाहिरातींसाठी देखील फोटोशूट केले.