एका मास्कसाठी दीपिका खर्च करते हजारो रुपये, जाणून घ्या तिच्या काळ्या मास्कची किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 01:37 PM2021-02-13T13:37:34+5:302021-02-13T13:41:53+5:30

नेहमीच दीपिका आपल्या हटके फॅशन आणि स्टाईलने साऱ्यांच्याच नजरा आकर्षित करून घेते. रिल लाईफ असो किंवा रिअल दीपिकाच्या स्टाईलवर सारेच फिदा असतात.

Deepika Padukone in black bodysuit and pants with Rs 25k mask does athleisure right | एका मास्कसाठी दीपिका खर्च करते हजारो रुपये, जाणून घ्या तिच्या काळ्या मास्कची किंमत

एका मास्कसाठी दीपिका खर्च करते हजारो रुपये, जाणून घ्या तिच्या काळ्या मास्कची किंमत

googlenewsNext

आतापर्यंत आपण सेलिब्रेटींच्या स्टायलिश लूकची वाहवा करताना पाहिलंय त्यात त्यांचे स्टायलिश ड्रेसपासून ते महागड्या वस्तूंच्या किंमती जाणून घेण्यात रसिकांना उत्सुकता असते. आता या स्टायलिश लूकमध्ये सेलिब्रेटींच्या मास्कही गणला जात आहे. अनेक सेलिब्रेटी त्यांच्या ट्रेंडी मास्कमुळे लक्ष वेधून घेत आहेत.

बॉलिवूडमध्ये स्टाइल आयकॉन म्हणून दीपिका ओळखली जाते. बॉलीवुडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचं नाव स्टायलिश अभिनेत्रींमध्ये सगळ्यात आघाडीवर नाव आहे. अशातच दीपिकाचे काही फोटो सोशल मीडियात खुप ट्रेन्ड होत आहेत. त्यामागे कारण तिचा मास्कच आहे. दीपिकाने काळ्या रंगाचे आउटफिट्स घातल्याचे दिसून येत आहे.

 

 

यावर मॅचिंग म्हणून काळ्या रंगाचा मास्कही लावला आहे. बरं मास्कची चर्चा होणे आता तसे काही विशेष राहिले नसले तरीही दीपिकाचा मास्क हा त्याच्या किंमतीमुळे चर्चेत आला आहे. काळ्या रंगाचा हा माक्त नॉर्मल मास्कप्रमाणेच दिसत असून त्याची किंमत वाचून तुम्हीही हैराण व्हाल. होय कारण मास्कची किंमत आहे तब्बल २५ हजार रु. या मास्कसाठी दीपिकाने हजारो रु मोजले आहेत. 

नेहमीच दीपिका आपल्या हटके फॅशन आणि स्टाईलने साऱ्यांच्याच नजरा आकर्षित करून घेते. रिल लाईफ असो किंवा रिअल दीपिकाच्या स्टाईलवर सारेच फिदा असतात.दीपिका तिच्या स्टाइल स्टेटमेंटमुळे पहिल्यांदाच चर्चेत आली आहे असे नाही जेव्हा दीपिकाचं  अभिनेता रणवीरसह शुभमंगल पार पडलं होतं. तेव्हा लग्नापेक्षा तिच्या महागड्या ड्रेसिंगचीच जास्त चर्चा रंगली होती. लग्नापासून ते रिसेप्शनपर्यंत दीपिकाच्या स्टाईलने साऱ्यांनाच घायाळ केले. सर्वत्र दीपिकाची ड्रेसिंग स्टाईल आणि फॅशनची चर्चा होती.

 

 

दीपिकाने लग्नात परिधान केलेला लेहंगा प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाचीने डिझाइन केला होता.विशेष म्हणजे या लेहंग्यावर दीपिकाने ओढलेल्या दुपट्ट्यावर सदा सौभाग्यवती भव असं लिहिलं होतं. दीपिकाने परिधान केलेल्या गोल्डन-रेड कॉम्बिनेशन असलेल्या या लेहंग्याची किंमत तब्बल ८.९५ लाख रुपये इतकी होती. इतकंच नाही तर मुंबईतील रिसेप्शनला एकदा तिने पांढऱ्या आणि गोल्डन रंगाचा डिझायनर ड्रेस तर एकदा लाल रंगाचाआकर्षक ड्रेस परिधान केला होता.

Web Title: Deepika Padukone in black bodysuit and pants with Rs 25k mask does athleisure right

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.