थांबता थांबेना दीपिका पादुकोणच्या त्या ड्रेसची चर्चा! कुणाला आठवला पोपट, कुणी म्हटले ग्रीन टी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2019 15:30 IST2019-05-19T15:30:00+5:302019-05-19T15:30:03+5:30
कान्स फिल्म फेस्टिवल 2019 गाजवल्यानंतर दीपिका पादुकोण मुंबईत परतली. पण कान्सच्या रेड कार्पेटवर तिने घातलेल्या ड्रेसची चर्चा मात्र अजूनही थांबलेली नाही.

थांबता थांबेना दीपिका पादुकोणच्या त्या ड्रेसची चर्चा! कुणाला आठवला पोपट, कुणी म्हटले ग्रीन टी!
कान्स फिल्म फेस्टिवल 2019 गाजवल्यानंतर दीपिका पादुकोण मुंबईत परतली. पण कान्सच्या रेड कार्पेटवर तिने घातलेल्या ड्रेसची चर्चा मात्र अजूनही थांबलेली नाही. दीपिकाच्या पहिल्या रेड कार्पेट लूकचे जोरदार कौतुक झाले. पण दुस-या रेड कार्पेट लूकने मात्र अनेकांची निराशा झाली. दुस-या दिवशी दीपिका पोपटी रंगाचा ड्रेस घालून कान्सच्या रेड कार्पेटवर उतरली. तिचा तो सी-ग्रीन रंगाचा लांबच लांब फेरी फ्लफी गाऊन आणि त्याला साजेशी हेअरस्टाइल व यासोबत केसांमध्ये माळलेले फॅब्रिकचे फुल असा तिचा हा लूक होता.
दीपिकाचा हा लॉन्ग फ्रिल गाऊन Giambattista Valli ने डिझाईन केला होता. तिचा हा लूक लोकांनी पाहिला आणि त्यावरून सोशल मीडियावर मजेदार मीम्सचा पूर आला. दीपिकाच्या डाय हार्ट फॅन्सला तिचा हा लूक आवडला. पण अनेकांना तिचा हा लूक जराही भावला नाही. दीपिका हे तू काय घातलंस? तू तर आमचं नाक कापलंस, अशी एक कमेंट एका युजरने दिली.
अजून राहा रणवीरसोबत.. हे तर होणारच होतं, असे एका अन्य युजरने लिहिले. या प्रतिक्रियांशिवाय दीपिकाच्या लूकवरचे मीम्सही व्हायरल झालेत. काहींनी दीपिकाच्या लूकची तुलना चक्क पोपटाशी केली. एका युजरने तर चक्क शॉवर नेटसोबत दीपिकाच्या या ड्रेसची तुलना केली. एका युजरला दीपिकाचा हा ड्रेस पाहून ग्रीन टीने भरलेला कप आठवला. गतवर्षीही दीपिकाच्या पिंक ड्रेसवरून असेच भन्नाट मीम्स बनले होते. लोकांनी तिच्या या लूकची जोरदार खिल्ली उडवली होती.