दीपिका पदुकोण २८ सप्टेंबरला आई होणार अशी चर्चा, 'या' तारखेचं रणबीर कपूरशी खास कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 11:02 AM2024-09-01T11:02:53+5:302024-09-01T11:03:56+5:30

काय आहे हे कनेक्शन जाणून घ्या.

Deepika Padukone could give birth to first baby on 28 september this date is close to Ranbir Kapoor know why | दीपिका पदुकोण २८ सप्टेंबरला आई होणार अशी चर्चा, 'या' तारखेचं रणबीर कपूरशी खास कनेक्शन

दीपिका पदुकोण २८ सप्टेंबरला आई होणार अशी चर्चा, 'या' तारखेचं रणबीर कपूरशी खास कनेक्शन

बॉलिवूडमधलं सर्वात चर्चेतलं कपल रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) लवकरच आईबाबा होणार आहेत. याच महिन्यात दीपिका बाळाला जन्म देणार आहे. दीपिका कोणत्या तारखेला आई होणार हेही काल माध्यमांमध्ये समोर आलं. २८ सप्टेंबर ही दीपिकाची डिलीव्हरी डेट आहे अशी चर्चा आहे. आता २८ सप्टेंबर हा दिवस आणखी एका सेलिब्रिटीसाठी स्पेशल आहे जो दीपिकाच्या अत्यंत जवळचाही आहे. काय आहे हे कनेक्शन जाणून घ्या.

२८ सप्टेंबर रोजी दीपिका पदुकोण बाळाला जन्म देणार अशी बातमी काल सगळीकडे चर्चेत होती. तर आता रणवीर दीपिकाच्या होणाऱ्या बाळाचं रणबीर कपूरशीही (Ranbir Kapoor) कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे. जर दीपिकाने २८ सप्टेंबरलाच बाळाला जन्म दिला तर त्यांच्या बाळाची आणि रणबीर कपूरची जन्मतारीख सारखीच असणार आहे. होय, रणबीर कपूरचा वाढदिवस २८ सप्टेंबरलाच असतो. त्यामुळे बेबी पदुकोण आणि रणबीर कपूर दोघंही एकच बर्थडेट शेअर करणार आहेत.

रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण एकेकाळी एकमेकांना डेट करत होते. दीपिका तर रणबीरच्या आकंठ प्रेमात होती. तिने त्याच्या नावाचा टॅटूही मानेवर गोंदवून घेतला होता. मात्र नंतर रणबीरने तिला धोका दिला त्यामुळे त्यांचं नातं तुटलं. ब्रेकअपमुळे दीपिका काही वर्ष डिप्रेशनमध्येही होती. रणवीर सिंहची आयुष्यात एन्ट्री झाल्यानंतर ती त्यातून बाहेर आली. आता रणवीर दीपिका आई बाबा होणार आहेत. तर  दुसरीकडे रणबीर कपूर गेल्या वर्षीच बाबा झाला आहे. रणबीर -दीपिका आपापल्या आयुष्यात पुढे गेले असले तरी काही कनेक्शन त्यांना जोडून ठेवतच आहेत.

Web Title: Deepika Padukone could give birth to first baby on 28 september this date is close to Ranbir Kapoor know why

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.