डिलिव्हरीनंतर ९ दिवसांनी राजकन्येसह घरी परतली दीपिका, आई झाल्यानंतर असं आहे रूटीन!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 03:53 PM2024-09-15T15:53:53+5:302024-09-15T15:54:13+5:30

रुग्णालयातून दीपिका आणि रणवीर हे आपल्या लाडक्या लेकीसह घरी पोहचले आहेत.

Deepika Padukone discharged from hospital after giving birth to baby girl Updates her Insta Bio | Ranveer Singh | डिलिव्हरीनंतर ९ दिवसांनी राजकन्येसह घरी परतली दीपिका, आई झाल्यानंतर असं आहे रूटीन!

डिलिव्हरीनंतर ९ दिवसांनी राजकन्येसह घरी परतली दीपिका, आई झाल्यानंतर असं आहे रूटीन!

Deepika Padukone Baby : अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh ) यांना 8 सप्टेंबर रोजी मुलगी झाली. डिलिव्हरीच्या 9 दिवसांनंतर आज 15 सप्टेंबर रोजी दीपिकाला रुग्णालयातून डिस्चार्ज  (Deepika Padukone Discharged From Hospital) मिळाला आहे.  रुग्णालयातून दीपिका आणि रणवीर हे आपल्या लाडक्या लेकीसह घरी पोहचले आहेत.

आपल्या लाडक्या लेकीसह घरी जातानाचा दीपिकाच्या ताफ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये त्यांची कार रुग्णालयातून बाहेर पडताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये दीपिका आणि रणवीरची पुसटशी झलक पाहायला मिळतेय. यासोबतच दीपिकाने आपल्या इन्स्टाग्रामवरील बायोमध्ये बदल केला आहे. त्यात तिने "Feed.Burp.Sleep.Repeat" असं लिहलं आहे. ज्याचा अर्थ खाऊ खाला, ढेकर द्या, झोपा आणि हेच पुन्हा करा" असा होतो. रिपोर्टनुसार दीपिका पादुकोण तिच्या मुलीच्या संगोपनासाठी नॅनी ठेवणार नसून तिला एकटीने वाढवणार आहे.


दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगच्या मुलीला पाहण्यासाठी शाहरुख खान आणि मुकेश अंबानी हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते.  दीप-वीरची छोटी परी नेमकी कोणासारखी दिसते याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागली आहे. पण, तिचा चेहरा पाहण्यासाठी चाहत्यांना बराच काळ वाट पाहावी लागणार आहे. कारण, दीपिका ही आपल्या मुलीलाही माध्यमांपासून दूर ठेवणार आहे. ती अनुष्का शर्मा-विराट-कोहली आणि आलिया भट्ट-रणबीर कपूर यांसारख्या नो-फोटो पॉलिसीचा अवलंब करणार आहे. 

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर दीपिका पदुकोण लवकरच 'सिंघम अगेन'मध्ये दिसणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित हा सिनेमा यावर्षी दिवाळीला रिलीज होणार आहे. रोहित शेट्टीचा कॉप युनिव्हर्सचा हा पाचवा चित्रपट आहे. यात रणवीर सिंगही दिसणार आहे. नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की 2898 एडी'मध्ये दीपिका शेवटची दिसली होती. या चित्रपटाने जगभरात 1000 कोटींहून अधिक कमाई केली होती. 
 

Web Title: Deepika Padukone discharged from hospital after giving birth to baby girl Updates her Insta Bio | Ranveer Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.