अभिनेत्री दीपिका पादुकोणकडून पंतप्रधान मोदींचं भरभरुन कौतुक; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 09:23 AM2024-02-02T09:23:25+5:302024-02-02T09:25:45+5:30

दीपिकाने खास पोस्ट शेअर करत मोदींचे कौतुक केलं.

Deepika Padukone Expressed Gratitude To Prime Minister Narendra Modi For Pariksha Pe Charcha Post Goes Viral | अभिनेत्री दीपिका पादुकोणकडून पंतप्रधान मोदींचं भरभरुन कौतुक; म्हणाली...

अभिनेत्री दीपिका पादुकोणकडून पंतप्रधान मोदींचं भरभरुन कौतुक; म्हणाली...

बाॅलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींंपैकी ती एक आहे. तिचा काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला फायटर हा चित्रपट हिट ठरलाय. या चित्रपटामध्ये दीपिका पादुकोण ही मुख्य भूमिकेत दिसली. आता दीपिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतंच पंतप्रधान मोदींचा परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम पाहून ती प्रभावीत झाली. यासाठी दीपिकाने खास पोस्ट शेअर करत मोदींचे कौतुक केलं. तसेच तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले आहेत.

दीपिकाने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. त्यात तिने लिहलं, 'आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले खूप खूप आभार. परीक्षेचा ताण टाळण्यासाठी तुम्ही शाळेतील मुले, त्यांचे पालक आणि शिक्षक यांच्याशी ज्या पद्धतीने संवाद साधाल तो कौतुकास्पद आहे'. यासोबतच दीपिकाने पंतप्रधानांच्या 'परीक्षा पे चर्चा ' कार्यक्रमाची लिंक शेअर केली. दीपिकाच्या या पोस्टला नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच राजधानी दिल्लीत ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात  विद्यार्थ्यांना संबोधित केलं.  मोदींनी देशातील लाखो विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी अनेक टिप्स दिल्या. मोदींनी केवळ विद्यार्थ्यांशीच नाही तर शिक्षक आणि पालकांशीही संवाद साधला. याचं अनेकांनी कौतुक केलं आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्यवर्ष सुरू होताच, सर्व राज्य मंडळांच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू होतात. या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याची स्थिती व दिशा ठरते. परीक्षेबाबत चर्चामुलांच्या मनात परीक्षेबाबत तणाव, भीती आणि प्रचंड अस्वस्थता असते, त्यावर मात करण्यासाठी मंत्रालयाकडून दरवर्षी परीक्षेबाबत चर्चा केली जाते.

फायटर सिनेमाबद्दल बोलायचे झाल्यास, यात दीपिकाने स्क्वॉड्रन लीडर मीनल राठोडची भूमिका साकारली आहे. 'फायटर' हा सिनेमा पुलवामा हल्ल्यावर आधारित आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कर पाकिस्तानवर कसं हवाई हल्ला करतं हे या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. या सिनेमात दीपिकाने आपल्या अप्रतिम अभिनयाने सर्वांना प्रभावित केले आहे. तसेच या चित्रपटाने आतापर्यंत 145 कोटींची कमाई केली आहे. 

Web Title: Deepika Padukone Expressed Gratitude To Prime Minister Narendra Modi For Pariksha Pe Charcha Post Goes Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.