-म्हणून दीपिकाच्या ‘गहराइयां’ सिनेमावर ट्रोलर्स करताहेत आगपाखड  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 12:32 PM2022-02-15T12:32:21+5:302022-02-15T12:34:44+5:30

Gehraiyaan : सोशल मीडियावर दीपिकाच्या या सिनेमाची चांगलीच खिल्ली उडवली जातेय. इतकंच नाही तर पुन्हा एकदा ‘#BoycottBollywood’ हा हॅशटॅग ट्रेंड होतोय.

deepika padukone film gehraiyaan brutally trolled hashtag boycott gehraiyaan trending |  -म्हणून दीपिकाच्या ‘गहराइयां’ सिनेमावर ट्रोलर्स करताहेत आगपाखड  

 -म्हणून दीपिकाच्या ‘गहराइयां’ सिनेमावर ट्रोलर्स करताहेत आगपाखड  

googlenewsNext

दीपिका पादुकोण (Deepika Padukone), सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे, धैर्य कारवा यांचा ‘गहराइयां’ (Gehraiyaan) हा चित्रपट नुकताच ओटीटीवर प्रदर्शित झाला. रिलीजआधी या चित्रपटाची चांगलीच हवा होती. पण सिनेमा रिलीज झाला अन् प्रेक्षकांचा अपेक्षाभंग झाला. दीपिका व सिद्धांतचे बोल्ड सीन्स यापलीकडे चित्रपटात काहीच नाही,अशा प्रतिक्रिया उमटल्या. सोशल मीडियावर दीपिकाच्या या सिनेमाची चांगलीच खिल्ली उडवली जातेय. इतकंच नाही तर पुन्हा एकदा ‘#BoycottBollywood’ हा हॅशटॅग ट्रेंड होतोय. दीपिकाचा ‘गहराइयां’ अपयशी ठरताच, हा हॅशटॅग शेअर करत, दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे चाहते आनंद साजरा करत आहेत.

सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर #BoycottBollywood हा हॅशटॅग सुरू झाला होता. त्यानंतरच्या काळात अनेकदा हा हॅशटॅग ट्रेंड झाला. आता हा हॅशटॅग वापरून दीपिका पादुकोणला लक्ष्य केलं जातंय. सुशांतचे चाहते दीपिकाच्या या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी करत आहेत. सुशांतच्या चाहत्यांनी आधीच ‘गहराइयां’ फ्लॉप असल्याचं घोषित केलं आहे. आता ‘गहराइयां’ आपटला म्हटल्यावर हे चाहते आनंद साजरा करत आहेत.

अलीकडे कंगना राणौतने दीपिकाच्या या सिनेमावर सडकून टीका केली होती. ‘गहराइयां’ म्हणजे कचरा आहे. कृपा करून सिनेमाच्या नावावर कचरा विकू नका. कितीही अंगप्रदर्शन केलं तरी वाईट सिनेमा वाईटच असतो, अशी इन्स्टास्टोरी तिने शेअर केली होती. अर्थात नंतर तिने ही स्टोरी डिलीट केली होती. 

 ‘गहराइयां’ हा सिनेमा शकुन बत्रा यांनी दिग्दर्शित केला आहे तर  करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने हा सिनेमा प्रोड्यूस केला आहे. दीपिका प्सादुकोण, धैर्य कारवा, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी  यांच्यासोबतच या चित्रपटात रजत कपूर आणि नसीरुद्दीन शाह यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Web Title: deepika padukone film gehraiyaan brutally trolled hashtag boycott gehraiyaan trending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.