'८३' चित्रपटामधला दीपिका पादुकोणचा लूक आला समोर, रोमी देव यांची भूमिका केली महिलांना समर्पित
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 11:05 AM2020-02-19T11:05:48+5:302020-02-19T11:07:14+5:30
रोमी देव यांच्या भूमिकेतील दीपिका पादुकोणचा पहिला लूक प्रदर्शित केला आहे.
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याचा आगामी चित्रपट '८३'च्या घोषणेपासून चर्चेत येत आहे. या चित्रपटात तो पहिल्यांदाच क्रिकेट वर्ल्ड कप जिंकणारे भारतीय संघाचे कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. '८३'चे पोस्टर रिलीज केल्यानंतर निर्मात्यांनी आता रोमी देव यांच्या भूमिकेतील दीपिका पादुकोणचा पहिला लूक प्रदर्शित केला आहे.
खऱ्या आयुष्यात रणवीर व दीपिका पती पत्नी असल्यामुळे कपिल आणि रोमी देव यांच्या भूमिकेतील त्यांची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर पाहणे कमालीचे ठरणार आहे. या पोस्टरमध्ये दीपिकाचा लूक खूप छान वाटत आहे. त्यामुळे तिला रोमी देव यांच्या भूमिकेत रुपेरी पडद्यावर पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.
याबद्दल दीपिका पादुकोण म्हणाली की, 'खेळातील इतिहासामधील सर्वात प्रतिष्ठीत क्षणांपैकी एका चित्रपटात छोटा पण महत्त्वपूर्ण भाग असणे सन्मानाची बाब आहे. एका नवऱ्याच्या पेशेत आणि व्यक्तिगत उद्दीष्ट्यांमधील यशात पत्नीची भूमिका किती महत्त्वाची असते हे मी व माझ्या आईने खूप जवळून पाहिले आहे. माझ्यासाठी कित्येक गोष्टींसाठी '८३' चित्रपट प्रत्येक महिलांसाठी समर्पित आहे जे आपल्या नवऱ्याच्या स्वप्नांना स्वतःच्या स्वप्नाआधी स्थान देतात.'
दीपिकासोबत बॉलिवूडमधील प्रत्येक मोठ्या दिग्दर्शकाला काम करायचं आहे. '८३' चित्रपटाचं शूटिंग तिने चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी केले
. तिच्याबद्दव दिग्दर्शक कबीर खान म्हणाले की, मी नेहमीच दीपिकाला एक चांगली अभिनेत्रीच्या रुपात पाहिले आहे आणि जेव्हा मी रोमी देव यांच्या भूमिकेच्या कास्टिंगचा विचार करत होतो त्यावेळी माझ्या डोक्यात पहिले तिचेच नाव आले. रोमीकडे खूप आकर्षक आणि सकारात्मक उर्जा आहे आणि दीपिकाने ही भूमिका समरस होऊन साकारली आहे. रणवीरसोबतची तिची केमिस्ट्री कपिल देव व रोमी यांचे नाते साकारण्यात खूप मदत करणार आहे. दीपिका आमच्या ८३ चित्रपटाच्या प्रवासातील अविभाज्य भाग बनल्यामुळे मी आनंदित आहे.