रणवीरमुळे दीपिकाच्या पदरात पडला 'रामलीला' सिनेमा, 'या' सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं झालेलं कास्टिंग, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 02:35 PM2023-10-26T14:35:12+5:302023-10-26T14:35:43+5:30

दीपिका नाही तर 'या' बॉलिवूड अभिनेत्रीचं 'रामलीला'साठी झालेलं कास्टिंग, रणवीरमुळे सिनेमा मिळाला आणि सुरू झाली लव्हस्टोरी

deepika padukone gets ramleela movie because of ranveer singh actor revealed in koffee with karan 8 | रणवीरमुळे दीपिकाच्या पदरात पडला 'रामलीला' सिनेमा, 'या' सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं झालेलं कास्टिंग, पण...

रणवीरमुळे दीपिकाच्या पदरात पडला 'रामलीला' सिनेमा, 'या' सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं झालेलं कास्टिंग, पण...

रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी आहे. रणवीर आणि दीपिकाने 'कॉफी विथ करण ८'च्या पहिल्या भागात हजेरी लावली. करण जोहरच्या या शोमध्ये त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. लग्न, करिअर याबरोबर अनेक किस्सेही रणवीर-दीपिकाने कॉफी विथ करणमध्ये सांगितले. 'कॉफी विथ करण'मध्ये रणवीरने 'रामलीला' सिनेमाबद्दल मोठा खुलासा केला आहे. 

'रामलीला' चित्रपटात रणवीर-दीपिका मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना भलतीच आवडली होती. पण, 'रामलीला' सिनेमासाठी दीपिका पदुकोण पहिली पसंत नव्हती. खुद्द रणवीरनेच 'कॉफी विथ करण'मध्ये याचा खुलासा केला. हा चित्रपट दीपिकाआधी करीना कपूरकडे गेला होता. या चित्रपटातील लीला या भूमिकेसाठी करीनाची निवड करण्यात आली होती. चित्रपटासाठी तयारी झाली होती. सेटही तयार होता. पण, शूटिंग सुरू होण्याच्या आठवडाभर आधीच काही कारणांमुळे करीनाने हा सिनेमा करण्यास नकार दिला. 

'रामलीला'मध्ये दीपिकाची एन्ट्री कशी झाली? 

करीनाने नकार दिल्यानंतर 'रामलीला' चित्रपटातील मुख्य नायिकेच्या भूमिकेत कोणाला घ्यायचं याबाबत दिग्दर्शक संजय लीला भन्साळी विचार करत होते. तेव्हाच रणवीरने त्यांना दीपिकाचं नाव सुचवलं. याबद्दल कॉफी विथ करणमध्ये रणवीर म्हणाला, "नायिकेच्या भूमिकेसाठी कोणाला घेता येईल याचा आम्ही विचार करत होतो. तेव्हाच कॉकटेल हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. भन्साळी सर, मी आणि बाकी साहाय्यक दिग्दर्शक कोणाला घ्यायचं याचा विचार करत होतो. मी दीपिकाचं नाव सुचवलं. कारण, मी कॉकटेल हा चित्रपट पाहिला होता. आणि त्यानंतर ती चित्रपटाचा भाग बनली." 

२०१३ साली संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'रामलीला' चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रणवीर आणि दीपिका मुख्य भूमिकेत होते. या सेटवरच त्यांच्यात जवळीक निर्माण झाली होती. त्यानंतर २०१५ साली त्यांनी गुपचूप साखरपुडा उरकला होता. २०१८मध्ये दीपिका आणि रणवीर विवाहबंधनात अडकले. 

Web Title: deepika padukone gets ramleela movie because of ranveer singh actor revealed in koffee with karan 8

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.