गोल्डन गाउनमध्ये दीपिकाची झाली अशीही फजिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2017 01:34 PM2017-01-14T13:34:06+5:302017-01-14T13:49:33+5:30

आगामी ‘ट्रिपल एक्स : रिटर्न आॅफ जेंडर केज’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी दोन दिवस भारतात आलेला हॉलिवूडचा अ‍ॅक्शन स्टार विन ...

Deepika Padukone in Golden Gown | गोल्डन गाउनमध्ये दीपिकाची झाली अशीही फजिती

गोल्डन गाउनमध्ये दीपिकाची झाली अशीही फजिती

googlenewsNext
ामी ‘ट्रिपल एक्स : रिटर्न आॅफ जेंडर केज’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी दोन दिवस भारतात आलेला हॉलिवूडचा अ‍ॅक्शन स्टार विन डिझेल याच्यासोबत दीपिकाचा जलवा बघण्यासारखा होता. कारण यावेळेस दीपिका वेगवेगळ्या ड्रेसमध्ये आपल्या सौंदर्याची अदा दाखविताना दिसली. तिचा गोल्डन गाउनमधील लूक तर सर्वाधिक चर्चिला गेला. मात्र या गाउनमुळे तिची चांगलीच फजिती झाल्याचेही बघावयास मिळाले. 





फॅशन डिझायनर नईम खान यांनी डिझाइन केलेल्या या गोल्डन गाउनमध्ये दीपिकाने कार्यक्रमस्थळी एंट्री करताच सगळ्याच्या नजरा तिच्यावर खिळल्या. कारण दीपिकाचा हा आऊटफिट खूपच बोल्ड होता. या गाउनमध्ये दीपिकाची नेकलाइन स्पष्टपणे दिसत होती. अतिशय स्टनिंग अंदाजात दिसत असलेली दीपिका मात्र हा गाऊन कॅरी करताना खूपच अनकम्फर्टेबल वाटत होती. 





ती वारंवार गाउन सावरताना दिसत होती. माध्यमांशी बोलताना तर तिची चांगलीच फजिती झाली होती. नेकलाइन झाकण्यासाठी तिची धडपड स्पष्टपणे दिसली. त्याचबरोबर विन डिझेल याला भेटण्यासाठी येणाºया बॉलिवूड कलाकारांसोबत बोलतानाही ती या गाउनमुळे अनकम्फर्टेबल असल्याचे स्पष्टपणे दिसत होती. 





नुकत्याच झालेल्या गोल्डन ग्लोब अवॉर्डसमध्ये प्रियांका चोप्रा अशाच प्रकारच्या आऊटफिटमध्ये दिसली होती. तिचा हा ड्रेस डिझायनर राल्फ लॉरेन यांनी डिझाइन केला होता. 9 जानेवारी रोजी झालेल्या या अवॉर्ड सेरेमनीच्या तीन दिवसांनी दीपिका पादुकोन प्रियाकाने परिधान केलेल्या आऊटफिटसारख्या गाउनमध्ये दिसली. पण काहीही असो दीपिका जरी या गाउनमध्ये अनकम्फर्टेबल दिसली असली तरी तिचा अंदाज विन डिझेल याला भावला नसेल तरच नवल.  




 

Web Title: Deepika Padukone in Golden Gown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.