दीपिका पदुकोणची झलक दिसली, ८ महिन्यांची गरोदर आहे अभिनेत्री; 'फेक बेबी बंप' मुळे पुन्हा ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 11:36 AM2024-08-09T11:36:12+5:302024-08-09T11:36:39+5:30

दीपिका पदुकोणचा व्हिडिओ व्हायरल

Deepika Padukone is 8 months pregnant soptted last night in mumbai trolled for fake pregnancy | दीपिका पदुकोणची झलक दिसली, ८ महिन्यांची गरोदर आहे अभिनेत्री; 'फेक बेबी बंप' मुळे पुन्हा ट्रोल

दीपिका पदुकोणची झलक दिसली, ८ महिन्यांची गरोदर आहे अभिनेत्री; 'फेक बेबी बंप' मुळे पुन्हा ट्रोल

बॉलिवूडची डिंपल क्वीन दीपिका पदुकोण (Deepika Padukone) पुढील महिन्यात बाळाला जन्म देणार आहे. दीपिका 8 महिन्यांची गरोदर असून नुकतीच तिची झलक पाहायला मिळाली. हिरव्या ड्रेसमध्ये दीपिका एका हॉटेलमध्ये डिनर करुन बाहेर पडताना दिसली. यावेळी तिचा बेबी बंप आणि चेहऱ्यावरचा ग्लो स्पष्ट दिसत होता. दीपिकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

दीपिका पदुकोण काल रात्री मुंबईत दिसली. हिरव्या रंगाच्या आऊटफिटमध्ये तू सुंदर दिसत होती. त्यात ती बेबी बंप स्पष्ट दिसत होता. तिच्यासोबत तिचा बॉडीगार्ड होता जो पावलापावलावर तिच्याकडे लक्ष देत होता. दीपिका 8 महिन्यांची गरोदर आहे त्यामुळे सध्या ती तब्येतीकडे जास्त लक्ष देत आहे. बरेच दिवसांनी काल तिला पाहिलं गेलं. हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर पापाराझींनी तिच्याभोवती गर्दी केली. याचवेळी एक महिला तिच्या बाळाला घेऊन बाहेर उभी होती तेव्हा दीपिकाने बाळाचे लाड केले आणि चाहत्यांसोबत फोटोही काढले. तिच्या चेहऱ्यावरचा ग्लो आणि मिलियन डॉलर स्माईलने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. हळूहळू चालत ती कारमध्ये बसली. 


दीपिकाच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी तिच्या लूक्स आणि फॅशनचं कौतुक केलं. मात्र यावेळीही ती 'फेक बेबी बंप' च्या चर्चांमुळे ट्रोल झाली. अनेकांना तिचा बेबी बंप खोटं असल्याचंच जाणवलं. तर काही जणांनी दीपिकाची बाजू घेत ट्रोलर्सची बोलती बंद केली. 

दीपिका सप्टेंबर महिन्यात बाळाला जन्म देणार आहे. नुकतीच ती 'कल्की 2898 AD' सिनेमात दिसली. या सिनेमाच्या प्रमोशनसाठीही तिने हजेरी लावली होती. आता ती आगामी 'सिंघम अगेन' मध्ये लेडी पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. 

Web Title: Deepika Padukone is 8 months pregnant soptted last night in mumbai trolled for fake pregnancy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.