दीपिकाने लॉन्च केली फेस क्रीम, नेटीझन्स म्हणाले- या किमतीत महिन्याभराचे राशन येईल...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 08:27 PM2022-12-01T20:27:07+5:302022-12-01T20:31:32+5:30
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने स्वतःचे स्किन प्रोडक्ट लाँच केले आहेत.
Deepika Padukone: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या चर्चेत आली आहे. तिने स्वतःचे स्किन प्रोडक्ट लाँच केले आहेत. दीपिका सोशल मीडियावर तिच्या ब्रँडच्या फेस क्रीमचे प्रमोशन करताना दिसली. पण, नेटकऱ्यांनी दीपिकाला तिच्या प्रोडक्टवरुन ट्रोल करायला सुरुवात केली आहे. ट्रोलिंगमागे नेमकं कारण काय? जाणून घ्या...
दीपिका ट्रोल
दीपिका पदुकोणने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये फेस क्रीम लावताना आणि त्याचे फायदे सांगताना दिसत आहे. आता तुम्ही विचार करत असाल की यात नवीन काय आहे. आजकाल प्रत्येक सेलेब्स ब्रँडची जाहिरात करत आहेत. तर, नवीन गोष्ट म्हणजे दीपिका ज्या फेस क्रीमला प्रमोट करतेय, त्याची किंमत 2,700 रुपये आहे. या किमतीमुळेच लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
व्हिडिओवर विविध कमेंट्स
तुम्ही हा व्हिडिओ नीट पाहिला तर तुम्हाला दिसेल की, दीपिका तिच्या चेहऱ्यावर क्रीम लावतीये पण कपाळावर नाही. ती तिच्या कपाळावर टचही करत नाही. तिने कपाळावर मेकअप केला आहे का, अशी विचारणा नेटकऱ्याकडून होत आहे. कमेंट्समध्ये नेटकरी हेच कारण देत आहेत. यासह विविध कमेंट्सही केल्या जात आहेत.
दीपिका उत्पादनावर टीका
आता लोकांनी दीपिका पदुकोणच्या प्रोडक्टबद्दल आपली मते मांडायला सुरुवात केली आहे. जनतेच्या प्रश्नांना ती उत्तरे देते की नाही हे पाहावे लागेल. दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलताना दीपिका लवकरच शाहरुख खानसोबत 'पठाण'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात दीपिकाला शाहरुख खानसोबत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.