का नाराज झालेत दीपिका पादुकोणचे चाहते? का ट्रेंड होतोय #NotMyDeepika
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 01:51 PM2019-07-21T13:51:09+5:302019-07-21T13:52:03+5:30
दीपिकाचे चाहते नाराज झालेले दिसले आणि यानंतर सोशल मीडियावर #NotMyDeepika ट्रेंड होऊ लागला.
दिग्दर्शक लव रंजन यांच्या चित्रपटांचा आपला एक चाहता वर्ग आहे. 2011 मध्ये लव रंजन यांनी ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते. यानंतर ‘प्यार का पंचनामा 2’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ आणि ‘दे दे प्यार दे’ सारखे सुपरहिट सिनेमे दिलेत. ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाने तर अनेक विक्रम तोडत 100 कोटींची कमाई केली. सध्या लव रंजन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शुक्रवारी संध्याकाळी दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर हे दोघे लव रंजन यांना भेटण्यासाठी त्यांच्या ऑफिसात पोहोचले. पण यानंतर सोशल मीडियावर ‘नॉट माय दीपिका’ हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला.
लव रंजन यांच्या ऑफिसबाहेर दीपिका व रणबीर एकत्र दिसताच लव रंजन यांच्या नव्या चित्रपटात ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार अशी चर्चा सुरु झाली. पण ही बातमी येताच, दीपिकाचे चाहते नाराज झालेले दिसले आणि यानंतर सोशल मीडियावर #NotMyDeepika ट्रेंड होऊ लागला.
Being the top actress of your country you have many people looking upto you, it is YOUR responsibility to set the right example. Are you even aware of how you are gonna promote someone who has sexually harassed other women by working in his film? #NotMyDeepika
— 𝐫𝐢𝐚 ❦ (@MonaDarlingx) July 20, 2019
अनेक चाहत्यांनी दीपिकाला लव रंजन यांचा चित्रपट न करण्याची विनंती केली. इतकेच नाही तर अनेकांनी लव रंजनचा चित्रपट साईन केल्यास तू हजारो चाहते गमावून बसशील, असेही लिहिले.
Deepika burning the script after she saw our love and realised her mistake #notmydeepika 🤣 pic.twitter.com/agct8xxuVs
— InFuckingCredible (@Dr_Crazen) July 20, 2019
#notmydeepika girl your ass better be not signing that luvrat movie or we going✈️ unstanning
— 𝐜𝐡𝐞𝐥𝐬𝐞𝐚 | 𝐦𝐮𝐥𝐭𝐢 𝐬𝐭𝐚𝐧 (@kajwaryaoutsold) July 20, 2019
लव रंजन आपल्या चित्रपटातील महिला विरोधी कंटेन्टसाठी ओळखले जातात. यासाठी अनेकदा त्यांच्या चित्रपटांवर टीका होते. या एका कारणामुळे दीपिका व रणबीर लव रंजन यांना भेटायला पोहोचताच चाहते नाराज झालेत. चाहते नाराज होण्यामागे एक दुसरे कारणही आहेच. ते म्हणजे, लव रंजन यांच्यावरचे गैरवर्तनाचे आरोप.
This #NotMyDeepika trend is the most sensible thing I've seen in a long time. Proud of Deepika Padukone fans. You guys are the best & y'all have the guts to call your favorite out on wrong & stand up for what's right. Respect & only respect. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 pic.twitter.com/zGkTypW1uO
— 😎Rebel Pwincess PaVeesa😎 (@PareesaZayn) July 20, 2019
मीटू मोहिमेअंतर्गत एका अभिनेत्रीने लव रंजन यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केला होता. 2010 मध्ये एका चित्रपटाच्या कास्टिंगदरम्यान लव रंजन यांनी मी ब्रा आणि पॅन्टीमध्ये कशी दिसते, हे पाहण्यासाठी कपडे उतरवण्यास सांगितले होते, असा आरोप या अभिनेत्रीने केला होता.