त्या सर्वांचा मला घराबाहेर काढण्याचा प्लान होता! दीपिकाच्या आईने केला धक्कादायक खुलासा!!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 10:52 AM2019-10-31T10:52:20+5:302019-10-31T11:00:22+5:30
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण म्हणजे बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री. दीपिका सतत तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. पण सध्या दीपिका नव्हे तर तिच्या आईची मुलाखत चर्चेत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण म्हणजे बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री. दीपिका सतत तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. पण सध्या दीपिका नव्हे तर तिच्या आईची मुलाखत चर्चेत आहे. होय, दीपिकाची आई उज्ज्वलापादुकोण यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एक धक्कादायक खुलासा केला आहे. माझ्या दोन्ही मुली दीपिका व अनीशा तसेच माझे पती मला घरातून काढण्याच्या विचारात होते, असे उज्ज्वला यांनी एका मुलाखतीत सांगितले. विशेष म्हणजे, याचे कारणही त्यांनी सांगितले.
‘माझे वडील एका ब्रिटिश बोर्डिंग स्कूलमध्ये शिकलेले आहेत. त्यामुळे ते शिस्तप्रिय आहेत. माझ्या घरी अतिशय शिस्तप्रिय वातावरण होते. घरी कडक नियम होते. लहानपणापासून अशा वातावरणात वाढल्याने मला ही शिस्त अंगवळणी पडली होती. लग्नानंतर पती आणि दोन्ही मुलींकडून मला अशाच शिस्तीची अपेक्षा होती. शिस्तप्रिय असल्याने त्यांच्यासोबतही मी तशीच वागायचे. पण माझ्या या अतिशिस्तप्रिय स्वभावाला दीपिका, अशीना व माझे पती इतके त्रासले होते की, सर्वजण मिळून ते मला घराबाहेर काढण्याच्या विचारात होते,’असे उज्ज्वला यांनी सांगितले. अर्थात हसत हसत.
दीपिका आईची अतिशय लाडकी आहे. आईसोबत तिचे अगदी मैत्रिणीसारखे नाते आहे. अनेकदा आपल्या आईसोबतचे फोटो ती शेअर करत असते.
दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास, लग्नानंतर दीपिकाचा ‘छपाक’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
मेघना गुलजार दिग्दर्शित हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधरित आहे. लक्ष्मी अग्रवाल या अॅसिड हल्ल्यातील पीडितेच्या आयुष्यावर बेतलेल्या या सिनेमात दीपिका लक्ष्मीची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमात दीपिकासोबत अभिनेता विक्रांत मेस्सीसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा 10 जानेवारी 2020ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय ‘83’ या सिनेमात ती पती रणवीर सिंगसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.