माधुरी दीक्षितचं लग्न लागताच दीपिकाच्या वडिलांची झाली होती वाईट अवस्था, वाचा काय आहे तो किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 05:30 PM2024-04-05T17:30:21+5:302024-04-05T17:32:58+5:30

दीपिका पादुकोणच्या वडिलांची माधुरी ही क्रश होतं.

Deepika Padukone Once Revealed Her Father Locked Himself In The Bathroom Upon Hearing Of Madhuri Dixit Wedding | माधुरी दीक्षितचं लग्न लागताच दीपिकाच्या वडिलांची झाली होती वाईट अवस्था, वाचा काय आहे तो किस्सा

माधुरी दीक्षितचं लग्न लागताच दीपिकाच्या वडिलांची झाली होती वाईट अवस्था, वाचा काय आहे तो किस्सा

बॉलिवूडची 'धकधक गर्ल' म्हणून अभिनेत्री माधुरी दीक्षित ओळखली जाते. अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर तिने गेली अनेक दशके प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. तिच्या कामाबरोबरच ती नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. करिअरच्या शिखरावर असताना तिने श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं होतं. ही बातमी कळताच अनेक तरुणांची हृदय तुटली होती. या तरुणांमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोणचे वडीलही होते. 

दीपिका पादुकोणच्या वडिलांची माधुरी ही क्रश होतं. माधुरीच्या लग्नाची बातमी समजली, तेव्हा दीपिकाच्या वडिलांची कशी हालत झाली होती, हे तिनं 2016 मध्ये 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. ती म्हणाली, 'माधुरीच्या लग्नाची बातमी कळताच ते खूप नाराज झाले होते. त्यांनी स्वतःला बाथरुममध्ये बंद करुन घेतलं होतं. त्यांचा चेहरा उतरला होता. त्यांच्या डोळ्याखाली काळी वर्तुळेदेखील आली होती. त्यामुळे ते किती दु:खी होते याचा अंदाज लावता येऊ शकतो'. या घटनेनंतर अनेकवेळा त्यांची मस्करी केल्याचंही दीपिकानं सांगितलं. 

माधुरीनं १९९९ साली डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर अनेक वर्ष माधुरी मनोरंजन सृष्टीतून ब्रेक घेऊन अमेरिकेत तिच्या संसारात रमली होती. त्या दोघांचं अरेंज मॅरेज आहे. तेव्हा श्रीराम नेने अमेरिकेत राहत असल्यानं त्यांचा लग्न सोहळा अमेरिकेत पार पडला होता. लग्नाच्या बऱ्याच वर्षानंतर माधुरी  माधुरी तिच्या कुटुंबासह अमेरिकेतून पुन्हा भारतात स्थायिक झाली आहे. भारतात आल्यानंतर तिने फिल्म इंडस्ट्रीतही कमबॅक केलं आहे. 
 

Web Title: Deepika Padukone Once Revealed Her Father Locked Himself In The Bathroom Upon Hearing Of Madhuri Dixit Wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.