दीपिका पादुकोण-प्रभासचा चित्रपट 'प्रोजेक्ट के'नं रिलीजच्या आधीच केली इतक्या कोटींची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 01:04 PM2023-01-03T13:04:40+5:302023-01-03T13:05:25+5:30
Project K Movie : साऊथचा 'बाहुबली' प्रभासचा आगामी 'प्रोजेक्ट के' या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
साऊथचा 'बाहुबली' प्रभास (Prabhas) फार क्वचितच चर्चेत येतो. त्याच्या आगामी 'प्रोजेक्ट के' (Project K) या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप जाहीर झालेली नाही, परंतु याआधीच त्याने १७० कोटींची कमाई केली आहे. हे वाचून तुम्ही चकीत झाला असाल ना? नाग अश्विन या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. तो भव्य चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे. प्रभासचा हा चित्रपट एक सायफाय चित्रपट असेल. भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार या चित्रपटाचा भाग असणार आहेत. यामध्ये दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, पवन कल्याण यांच्यासह अनेकांची नावे आहेत.
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, प्रभासच्या 'प्रोजेक्ट के'चे निजाम हक्क ७० कोटींना विकले गेले आहेत. सुनील नारंग यांनी त्यांना विकत घेतले आहे. सुनील नारंग हे आशियाई सुनील या नावाने इंडस्ट्रीत खूप लोकप्रिय आहेत. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे आंध्र प्रदेशचे हक्क जवळपास १०० कोटींना विकले गेले आहेत. म्हणजेच टॉलिवूडमध्येच या चित्रपटाने एकूण १७० कोटींची कमाई केली आहे. कमाईच्या सुमारे ५० टक्के चित्रपट फक्त त्याच्या राइट्समधून कमावेल. या चित्रपटाच्या उर्वरित वितरण राइट्सचीही मोठी मागणी आहे. रिलीजनंतरही बॉक्स ऑफिस कलेक्शन बाकी आहे.
प्रभास आणि त्याच्या टीमने चित्रपटाचे जवळपास ८० टक्के शूटिंग पूर्ण केले आहे. फक्त २०% शिल्लक आहे. हेही येत्या काही महिन्यांत पूर्ण होईल. चित्रपटात भारदस्त सीजीआय (कॉम्प्युटर जनरेटेड इमेजनरी) दिसणार आहे. त्यामुळे पोस्ट प्रॉडक्शनला बराच वेळ लागणार आहे. हा चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांना या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. ५०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट किती अप्रतिम आहे हे आगामी काळच सांगेल. प्रभासचे 'राधे श्याम' आणि 'साहो' हेही बिग बजेट चित्रपट होते, पण या दोघांपैकी एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही.