Saturday Night Vibes! करण जोहरच्या घरी रंगली ‘लेट नाईट पार्टी’, पाहा व्हिडीओ!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 14:33 IST2019-07-28T14:32:39+5:302019-07-28T14:33:50+5:30
बॉलिवूडचा मोस्ट फेवरेट करण जोहरला मित्रांसोबत पार्टी करणे आवडते. बॉलिवूडचे त्याचे अनेक मित्र सर्रास करणच्या घरी पार्टी करताना दिसतात. शनिवारी रात्रीही करणच्या घरी अशीच पार्टी रंगली.

Saturday Night Vibes! करण जोहरच्या घरी रंगली ‘लेट नाईट पार्टी’, पाहा व्हिडीओ!!
बॉलिवूडचा मोस्ट फेवरेट करण जोहरला मित्रांसोबत पार्टी करणे आवडते. बॉलिवूडचे त्याचे अनेक मित्र सर्रास करणच्या घरी पार्टी करताना दिसतात. शनिवारी रात्रीही करणच्या घरी अशीच पार्टी रंगली. या लेट नाईट पार्टीत बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी हजेरी लावली. दीपिका पादुकोण, रणबीर कपूर, वरूण धवन, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, विकी कौशल, शाहिद कपूर असे सगळेजण या पार्टीत दिसले.
करणने या लेट नाईट पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सगळे स्टार्स एकत्र बसलेले दिसत आहे.
सर्वप्रथम या व्हिडीओत दीपिका दिसते. अर्थात तिचा हबी रणवीर सिंग कुठेही दिसत नाही. पाठोपाठ दीपिकाचा एक्स बॉयफ्रेन्ड रणबीर कपूरही या व्हिडीओत दिसतो. पण त्याची गर्लफ्रेन्ड आलिया भट्ट ही मात्र दिसत नाही. मलायका अरोरा मात्र तिचा बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूरसोबत दिसतो. वरूण धवन याची गर्लफ्रेन्ड नताशा दलाल ही सुद्धा या व्हिडीओ दिसते. झोया अख्तर आणि अयान मुखजी हेही व्हिडीओत दिसतात.
करण जोहरने हा व्हिडिओ शेअर करताना ‘सॅटरडे नाईट व्हाईब्स’ असे कॅप्शन दिले आहे. हा सॅटरडे नाईटचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. काही तासांमध्येच हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे. तू आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांना पार्टीत का बोलावले नाही, असा प्रश्नही हा व्हिडीओ पाहून चाहते विचारत आहेत. आता करण तर या प्रश्नाचे उत्तर देणार नाही, तेव्हा आम्हीच या प्रश्नाचे उत्तर देतो. कारण आलिया सध्या ऊटी येथे ‘सडक 2’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. तर रणवीर लंडनमध्ये ‘83’च्या चित्रीकरणात बिझी आहे.