मुंबईचे रिसेप्शन झाल्यानंतर रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण करणार आहेत ही कामे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 04:15 PM2018-11-24T16:15:19+5:302018-11-24T16:19:11+5:30
रणवीर आणि दीपिका लग्नाच्या कित्येक दिवस आधीपासून लग्नाच्या तयारीला लागले होते. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांना कोणत्याही चित्रपटाचे चित्रीकरण करणे शक्य झाले नाही. पण आता मुंबईचे रिसेप्शन आटपल्यानंतर ते आपल्या कामाला पुन्हा लागणार आहेत.
इटलीत लेक कोमोमध्ये शाही विवाह पार पडल्यानंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी भारतातील पहिले रिसेप्शन नुकतेच बंगळूरू येथे दिले. बंगळुरुच्या लीला पॅलेसमध्ये हा रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. बेंगळुरुच्या रिसेप्शनला क्रिकेट आणि बॅडमिंटन जगतातील अनेक मान्यावरांनी उपस्थितीत लावली होती. हे रिसेप्शन दीपिकाच्या आई-वडिलांकडून आयोजित करण्यात आलेले होते. त्यानंतर आता दोन रिसेप्शन मुंबईत होणार आहेत. येत्या २८ नोव्हेंबर आणि १ डिसेंबरला मुंबईच्या ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये केवळ मित्र आणि कुटुंबीयांसाठी दीपिका आणि रणवीरने रिसेप्शन आयोजित केले आहे तर १ डिसेंबरचे रिसेप्शन केवळ बॉलिवूडमधील मित्रपरिवारासाठी असेल.
रणवीर आणि दीपिका लग्नाच्या कित्येक दिवस आधीपासून लग्नाच्या तयारीला लागले होते. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांना कोणत्याही चित्रपटाचे चित्रीकरण करणे शक्य झाले नाही. पण आता मुंबईचे रिसेप्शन आटपल्यानंतर ते आपल्या कामाला पुन्हा लागणार आहेत. रणवीर सिंगचा सिम्बा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून रणवीर या चित्रपटाच्या प्रमोशनला डिसेंबरमध्ये सुरुवात करणार आहे तर दीपिका मेघना गुलजारच्या आगामी चित्रपटावर काम करणार आहे. अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या लक्ष्मी अग्रवालवर आधारित चित्रपट मेघना दिग्दर्शित करत असून त्यात दीपिका मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला ती मार्चमध्ये सुरुवात करणार असल्याचे कळतेय.
रणवीर आणि दीपिकाने केवळ त्यांच्या जवळच्या नातलगांच्या आणि मित्रमैत्रिणीच्या उपस्थितीत इटलीला लग्न केलं. हे लग्न अतिशय थाटामाटात झाले. तसेच या लग्नाला प्रचंड सुरक्षा देखील ठेवण्यात आली होती. लग्नातील कोणत्याही पाहुण्याला लग्न विधी अथवा लग्न परिसरातील कोणताही फोटो अथवा व्हिडिओ काढण्याची परवानगी नव्हती. कोंकणी आणि सिंधी अशा दोन पद्धतीने त्यांनी लग्न केले. सिंधी पद्धतीने लग्न झाल्यानंतर त्याच दिवशी दीपिका आणि रणवीने त्यांच्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांच्या लग्नाचे काही फोटो पोस्ट केले होते.