लक्झरीयस गाड्या अन् अलिशान घर; 'इतक्या' कोटींचे मालक आहेत दीपिका पादुकोण-रणवीर सिंग!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 10:21 AM2024-07-07T10:21:59+5:302024-07-07T10:33:51+5:30

बॉलिवूडचं सर्वात चर्चित कपल कोणतं तर रणवीर सिंग व दीपिका पादुकोण.

Deepika Padukone Ranveer Singh Net Worth who has how much money? | लक्झरीयस गाड्या अन् अलिशान घर; 'इतक्या' कोटींचे मालक आहेत दीपिका पादुकोण-रणवीर सिंग!

लक्झरीयस गाड्या अन् अलिशान घर; 'इतक्या' कोटींचे मालक आहेत दीपिका पादुकोण-रणवीर सिंग!

Deepika Padukone Ranveer Singh Net Worth: बॉलिवूडचं सर्वात चर्चित कपल कोणतं तर रणवीर सिंग (Ranveer Singh) व दीपिका पादुकोण ( Deepika Padukone).  २०१५ मध्ये गुपचूपपणे साखरपुडा केल्यानंतर दीपिका आणि रणवीरने २०१८ मध्ये इटलीत लग्नगाठ बांधली. लवकरच ते आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहेत.  दोघेही बॉलीवूडमधील सुपरस्टार कलाकारांपैकी आहेत. रणवीर श्रीमंत की दीपिका ? असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर त्याचं उत्तर आहे, दीपिका. होय, दीपिकाची नेटवर्थ रणवीरपेक्षा दुप्पट आहे.

रणवीर आणि दीपिका हे दोघेही बॉलिवूडमधी यशस्वी कलाकार आहेत.  रणवीर सिंग बॉलिवूडच्या सर्वाधिक महागड्या अभिनेत्यांपेक्षा एक आहे. तर दीपिकासुद्धा कमी नाही. रणवीर कोट्यावधी रूपयांचा मालक आहे. पण संपत्तीच्या बाबतीत दीपिका रणवीरपेक्षा बरीच पुढे आहे. इंडस्ट्रीमध्ये गेल्या १४ वर्षांपासून सक्रीय असलेला रणवीर चित्रपटांतून बक्कळ कमाई करतोय. शिवाय जाहिरातींमधूनही कोट्यावधी रूपये कमावतो. जनसत्ताच्या रिपोर्टनुसार,  रणवीरची एकूण संपत्ती २४५ कोटी रुपये आहे.

दीपिकाचं म्हणाल तर  नेटवर्थ ५०० कोटींच्या आसपास आहे. दीपिका ही लुई व्हिटॉन, लेव्हीज, पेप्सी, तनिष्क सारख्या ब्रँड्सच्या जाहिरातींमधून मोठी कमाई करते.  तसेच तिचा स्वतःचा स्किनकेअर ब्रँड आहे.  बॉलिवूड इंडस्ट्रीमधून सर्वाधिक करदात्यांपैकी ती एक आहे. २०१६-२०१७ या आर्थिक वर्षात तिने १० कोटी रुपये कर भरला होता. तर गेल्या वर्षी भारतातील सर्वाधिक वैयक्तिक करदात्यांच्या यादीत स्थान मिळवणारी ती एकमेव महिला अभिनेत्री होती. 

याशिवाय, दीपिकाची BluSmart, Supertails, Blue Tokai आणि Bellatrix Aerospace सारख्या अनेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूकदेखील आहे. दीपिका ही सिनेमांसाठी १५ ते २० कोटी मानधन घेते. तर एका ब्रँड एंडोर्समेंटसाठी अभिनेत्री तब्बल ८ कोटी रुपये घेते. दीपिकाचं मुंबईसह बंगळुरुमध्ये स्वत:चं घर आहे. तर रणवीर आणि दीपिका या दोघांची एकूण संपत्ती 745 कोटी रुपये आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं लवकरच दीपिका ही  'सिंघम अगेन' आणि 'ब्रह्मास्त्र २' सारख्या या बिग बजेट चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तर रणवीर सिंग हा 'डॉन ३' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  गरोदर असल्याने  सध्या, दीपिका ब्रेकवर आहे, कधीकधी ती इव्हेंट्स आणि पार्ट्यांमध्ये किंवा तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसते. दीपिका ही सध्या ७ महिन्यांची गरोदर आहे आणि सप्टेंबरमध्ये ती बाळाला जन्म देणार आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीर यांनी 29 फेब्रुवारी 2024 रोजी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. 

Web Title: Deepika Padukone Ranveer Singh Net Worth who has how much money?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.