Deepika Padukone Ranveer Singh Wedding: ...तेव्हाच बघायला मिळणार दीपवीरच्या लग्नाचे फोटो!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 13:13 IST2018-11-14T13:07:24+5:302018-11-14T13:13:37+5:30
प्रत्येक जण दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहण्यास उत्सूक आहे. वधूच्या पोशाखातील दीपिका आणि वराच्या पोशाखातला रणवीर पाहण्यासाठी चाहते आतूर झाले आहेत. पण हा सोहळा अतिशय खासगी ठेवण्यात आल्याने अद्याप इटलीतील या विवाह सोहळ्याचा एकही फोटो अद्याप बाहेर आलेला नाही.

Deepika Padukone Ranveer Singh Wedding: ...तेव्हाच बघायला मिळणार दीपवीरच्या लग्नाचे फोटो!!
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांचा लग्नसोहळा सुरु होण्यास काही तासांचा अवकाश आहे. अशात प्रत्येक जण दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहण्यास उत्सूक आहे. वधूच्या पोशाखातील दीपिका आणि वराच्या पोशाखातला रणवीर पाहण्यासाठी चाहते आतूर झाले आहेत. पण हा सोहळा अतिशय खासगी ठेवण्यात आल्याने अद्याप इटलीतील या विवाह सोहळ्याचा एकही फोटो अद्याप बाहेर आलेला नाही. लग्नाचा एकही फोटो सोशल मीडियावर अपलोड न करण्याची अट पाहुण्यांपुढे ठेवण्यात आली आहे. अन्य कुणाच्याही हाती लग्नाचा एकही फोटो पडणार नाही, यासाठीही खास व्यवस्था करण्यात आली आहे. मोबाईलचा कॅमेरा स्टिकर्सनी झाकण्यापासून तर ड्रोन वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. प्रत्येकाला विशिष्ट कोड असलेला ई-पासही देण्यात आला आहे. एकंदर काय तर सुरक्षा व्यवस्था तगडी आहे आणि त्यामुळे दीपवीरच्या लग्नाचा एकही फोटो लीक होणे कठीण आहे. पण यामुळे निराश होण्याची गरज नाही. होय, कारण स्वत: दीपवीर आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करणार आहेत. अर्थात योग्यवेळी.
होय, पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, दीपिका व रणवीर स्वत: आपल्या या अतिशय खास क्षणांचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करू इच्छितात. प्रोफेशनल फोटोग्राफरने काढलेला आणि स्वत: निवडलेलाचं फोटो सोशल मीडियावर टाकला जाईल, यासाठी त्यांनी इतका कडेकोट बंदोबस्त केला आहे. आपल्याशिवाय अन्य कुणीही आपल्या लग्नाचा फोटो शेअर करू नये, यासाठी ही काळजी घेतली जात आहे. त्यामुळे दीपिका व रणवीरच्या फोटोची प्रतीक्षा करुयात आणि तोपर्यंत या लग्नाबद्दलचे अपडेट्स वाचू यात...