​गंगा आरतीसाठी ऋषिकेशला पोहोचली दीपिका पादुकोण!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2017 05:10 AM2017-04-04T05:10:59+5:302017-04-04T10:40:59+5:30

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या ‘पद्मावती’मध्ये बिझी आहे. पण कामाच्या व्यापात दीपिकाला मनाची शांती गमवायची नाही, असेच दिसतेय. कदाचित ...

Deepika Padukone reached Rishikesh for Ganga Arti | ​गंगा आरतीसाठी ऋषिकेशला पोहोचली दीपिका पादुकोण!

​गंगा आरतीसाठी ऋषिकेशला पोहोचली दीपिका पादुकोण!

googlenewsNext
लिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या ‘पद्मावती’मध्ये बिझी आहे. पण कामाच्या व्यापात दीपिकाला मनाची शांती गमवायची नाही, असेच दिसतेय. कदाचित मनाच्या या शांतीच्या शोधात काल संध्याकाळी दीपिका ऋषिकेशला पोहोचली. याठिकाणी ती गंगा आरतीत सामील झाली. पांढरा कुर्ता, अंगावर शाल अशा अगदी साध्या पोशाखात दीपिका आरतीत सामील झाली.



सर्वसामान्य व्यक्तिसारखी ती आरती करताना दिसली. कुठलाही बडेजाव नाही, चेह-यावर कुठलाही दर्प नाही हे तिचे रूप सगळ्यांनाच मोहवून गेले.


आरती करतानाचे तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात दीपिकाच्या चेहºयावर एक वेगळीच शांती दिसतेय. चित्त स्थिर दिसतेय. गंगा किना-यावर दीपिकाने यज्ञात आहुतीही दिली.



ऋषिकेशची तिची ही भेट अतिशय गुप्त ठेवण्यात आली होती. मीडियालाही याची भणक लागू नये, हेच तिचे प्रयत्न होते. अर्थात तरिही ती कॅमेºयांच्या नजरेतून स्वत:ला वाचवू शकली नाही.



१३ किलोमीटरचा लाँग कट घेऊन दीपिका परमार्थ घाटावर पोहोचली. अर्थात ती येथे पोहोचल्याची बातमी वाºयासारखी पसरली आणि मग तिला पाहण्यासाठी लोकांची एकच गर्दी उसळली. यावेळी काही पत्रकारांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण दीपिकाने अतिशय विनम्रपणे बोलण्यास नकार दिला. गंगा आरतीनंतर पावणे आठच्या सुमारास दीपिका सडकमार्गे आपल्या हॉटेलकडे निघून गेली. या काळात तिच्या चेहºयावरील स्मितरेषा जराही ढळली नाही. गंगा आरतीनंतर एक आत्मिक, अनामिक शांती घेऊन दीपिका पुन्हा एकदा तिच्या त्याच ग्लॅमर दुनियेत परतणार. कॅमेºयासमोर एक नवा चेहरा धारण करणार. या मार्गात एक आत्मिक शांती कायम तिच्या सोबत असावी, हीच आशा बाळगू यात.

Web Title: Deepika Padukone reached Rishikesh for Ganga Arti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.