रणवीर सिंग आई-वडिलांना नव्हे, तर 'या' व्यक्तीला घाबरतो, दीपिकाच्या विधानानं चाहते संभ्रमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 19:54 IST2018-12-25T19:43:20+5:302018-12-25T19:54:15+5:30
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाला आता एक महिन्यापेक्षा जास्त दिवस होऊन गेले आहेत. इटली सारख्या निसर्गरम्य ठिकाणी दोघे विवाह बंधनात अडकले

रणवीर सिंग आई-वडिलांना नव्हे, तर 'या' व्यक्तीला घाबरतो, दीपिकाच्या विधानानं चाहते संभ्रमात
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाला आता एक महिन्यापेक्षा जास्त दिवस होऊन गेले आहेत. इटली सारख्या निसर्गरम्य ठिकाणी दोघे विवाह बंधनात अडकले. इटलीत लग्न केल्यानंतर दोघांनी बेंगळुरु आणि मुंबईत दोनही ठिकाणी लग्नाची रिसेप्सन पार्टी दिली. यानंतर रणवीर सिंग त्याचा आगामी सिनेमा सिम्बाच्या प्रमोशनला देखील लागला.
दीपवीर लग्नानंतर आपल्या मॅरिड लाईफबाबत दिलखुलास बोलताना दिसतात. दोघे कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी एकमेकांची स्तुती करताना थकत नाहीत.
नुकत्याच एका इंटरव्ह्यू दरम्यान दीपिकाने आपल्या लग्नाबाबतच्या सुंदर आठवणी शेअर केल्या. फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखती दरम्यान दीपिकाने रणवीर सिंगला घेऊन एक मोठा खुलासा केला. दीपिका म्हणाली, रणवीर सिंग त्याच्या आई-वडीलांपेक्षा जास्त मला घाबरतो. दीपिकाचा लग्नानंतरचा पहिला इंटरव्ह्यू होता.
या मुलाखतीत लग्नावरही दीपिका बोलली. रणवीर माझ्या भांगात कुंकू भरत असताना मला ‘ओम शांती ओम’चा ‘एक चुटकी सिंदूर’ हा डायलॉग आठवत होता. मी अनेक लग्नाला गेले. पण स्वत:चे लग्न हा किती खास क्षण असतो, हे मला माझ्याच लग्नावेळी जाणवले, असे दीपिका यावेळी म्हणाली. मी अनेक वर्षे एकटी राहिली. पण आता रणवीर माझ्यासोबत आहे. रणवीर त्याच्या कामावर जातो आणि मी माझ्या. पण सकाळी आम्ही एकत्र उठतो. हे लग्नाची सर्वात खास बाब आहे, असेही तिने सांगितले