दीपिका पदुकोण म्हणाली, 'रणवीरसोबत राहणे म्हणजे.....वाचून उंचावल्या सा-यांच्या भुवया
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 10:49 AM2020-06-16T10:49:06+5:302020-06-16T10:49:38+5:30
लग्नानंतर दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह लॉकडाऊनमुळे पहिल्यांदाच लग्नानंतर हे कपल एकत्र इतका वेळ घालवत आहेत.
बॉलीवुडची मस्तानी दीपिका पदुकोण आणि बॉलीवुडचा बाजीराव रणवीर सिंह हे लव्हबर्ड्स आता ट्रेंडिग कपल बनले आहे. रोज त्यांच्याविषयीच्या अनेक अपडेट जाणून घेण्यात त्यांच्या चाहत्यांना रस असतो. लॉकडाऊनमुळे पहिल्यांदाच लग्नानंतर हे कपल एकत्र इतका वेळ घालवत आहे. लग्नानंतर दोघांना एकमेकांसाठी इतका वेळ देणे शक्यच नव्हते. त्यामुळे सध्या मिळालेला वेळेचा सुदपयोग हे कपल करत आहे. दोघांच्याही कामांना अद्याप सुरूवात झाली नसल्यामुळे दोघे घरीच आहेत. अशीत दीपिकाने रणवीरसह राहणे सर्वात सोपे असल्याचे म्हटले आहे. दिलेल्या एका मुलाखतीत दीपिकाने पती रणवीर सिंगचे कौतुक केले आहे.
लॉकडाऊनच्या काळात रणवीरसोबत राहणे सर्वात सोपे आहे, कारण तो 20 तास झोपतोय ज्यामुळे मला सर्व काही करण्याची संधी मिळतेय. जेव्हा तो चार तासांसाठी उठतो, तेव्हा आम्ही एकत्र खातो, चित्रपट पाहतो आणि व्यायाम करतो. या वेळी त्याच्याबरोबर वेळ घालवणे सर्वात आनंददायक आहे, तो खूप साधाभोळा नवरा आहे.
इटॅलियन आणि कॉन्टिनेन्टल खाद्यपदार्थ मी चांगले बनवते. याकाळात माझी स्वयंपाक शिकण्याची इच्छाही मी पूर्ण केली. छोट्या छोट्या गोष्टी शिकण्यात खूप मदतही झाली असे तिने सांगितले.