म्हणून दीपिका पादुकोण म्हणतेय आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही पण !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2017 07:16 AM2017-04-15T07:16:16+5:302017-04-15T12:46:16+5:30
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दीपिका पादुकोण ही भारताची पवित्र भूमी ऋषिकेशच्या घाटावर पोहचली. पांढरा कुर्ता आणि शाल परिधान केलेल्या दिपिकानं ...
क ही दिवसांपूर्वी अभिनेत्री दीपिका पादुकोण ही भारताची पवित्र भूमी ऋषिकेशच्या घाटावर पोहचली. पांढरा कुर्ता आणि शाल परिधान केलेल्या दिपिकानं गंगाघाटावर पूजा केली. तिने सहकुटुंब भगवान शंकराचं दर्शन घेऊन, संध्याकाळच्या गंगा आरतीमध्ये सहभाग घेतला. यावेळी दीपिकासह तिचे कुटुंबीयसुद्धा उपस्थित होते. परमार्थ निकेतनचे अध्यक्ष स्वामी चिदानंद सरस्वती महाराज आणि साध्वी भगवती यांच्यासोबत तिने धार्मिक पद्धतीनं गंगापूजन केलं. यावेळी आरती करण्यासोबतच दीपिकाने घाटावर हवन-यज्ञसुद्धा केला. मात्र अचानक दीपिका ऋषिकेशच्या घाटावर कशी पोहचली. तिने आरती का केली यावरुन बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा आणि तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर तिच्या या गंगाआरतीचे रहस्य आता उघड झालं आहे. दीपिकाची आई उज्ज्वला पादुकोण यांची इच्छा होती की दीपिकानं ऋषिकेश घाटावर जाऊन गंगाआरती करावी. आईने एखादी इच्छा व्यक्त केल्यानंतर ती कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचीच असा निर्धार दीपिकाने केला होता. त्यामुळेच आपल्या शुटिंगच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत दीपिका ऋषिकेशच्या घाटावर पोहचली. तिथे तिने सर्व धार्मिक विधी करत गंगाआरती केली. इतकंच नाही तर गंगाआरती झाल्यावर तिने ऋषिकेशमध्ये गंगा नदीतील वाढत्या प्रदूषणाबाबतही चिंता व्यक्त केली. यावेळी तिने आपले फॅन्स आणि स्थानिकांना गंगा नदी स्वच्छ ठेवण्याचं आवाहन केलं. शिवाय गंगा नदीचा परिसरसुद्धा तितकाच स्वच्छ आणि सुंदर असावा अशी इच्छाही तिनं त्यांच्याकडे व्यक्त केली. दीपिकाच्या अभिनयाचे, तिच्या अदांचे रसिक फॅन्स आहेत. आता तिनं आईच्या इच्छेखातर गंगाआरती करुन आणि त्यानंतर गंगास्वच्छतेचं आवाहन करुन रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलंय.