शाहरूख खानआधी बॉलिवूडमधील 'या' खानने दीपिकाला दिली होती पहिल्या सिनेमाची ऑफर, कोण आहे तो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 13:32 IST2022-02-23T13:31:34+5:302022-02-23T13:32:08+5:30
Deepika Padukone : शाहरूख खानसोबत 'ओम शांती ओम' करण्याआधीच तिला दुसऱ्या एका खानने सिनेमाची ऑफऱ दिली होती. पण काही कारणाने तिने 'त्या' खानला नकार दिला.

शाहरूख खानआधी बॉलिवूडमधील 'या' खानने दीपिकाला दिली होती पहिल्या सिनेमाची ऑफर, कोण आहे तो?
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोन आज इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींमध्ये आहे. एकापेक्षा हिट सिनेमे तिने दिले आहेत. बॉलिवूडच्या एखाद दुसरा मोठा स्टार सोडला तर तिने सर्वांसोबत काम केलं आहे. तिने शाहरूख खानसोबत 'ओम शांती ओम' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. पण तिने आता खुलासा केला की, जर तिने नकार दिला नसता तर ती शाहरूख खानऐवजी दुसऱ्याच खानसोबत डेब्यू करू शकली असती.
'बॉलिवूड हंगामा'ला दिलेल्या मुलाखतीत दीपिकाने सांगितलं की, शाहरूख खानसोबत (Shahrukh Khan) 'ओम शांती ओम' करण्याआधीच तिला दुसऱ्या एका खानने सिनेमाची ऑफऱ दिली होती. पण काही कारणाने तिने 'त्या' खानला नकार दिला आणि तिने शाहरूख खानसोबत काम करण्यास तयारी दर्शवली. हा दुसरा खान म्हणजे सलमान खान (Salman Khan). तिने सांगितलं की, शाहरूख खानआधी तिला सलमान खानने सिनेमाची ऑफर दिली होती.
दीपिकाने सांगितलं की, सलमान खानने त्यावेळी माझ्यात पोटेंशिअल पाहिलं होतं. पण त्यावेळी तिला अभिनेत्री व्हायचं नव्हतं किंवा सिनेमात काम करायचं नव्हतं. ती म्हणाली की, आमच्यात नेहमीच फार सुंदर नातं राहिलं आहे. मी नेहमीच सलमान खान यांची आभारी राहीन. कारण ते पहिले व्यक्ती होते ज्यांनी मला सिनेमाची ऑफर दिली होती. तेव्हा मी मॉडलिंग सुरू केली होती. ही ट्रॅजेडी आहे की, मी त्यावेळी सिनेमासाठी तयार नव्हते. पण बघा त्याच्या २ वर्षानी ओम शांती ओम आला. सलमानने तेव्हा माझ्यातील क्षमता ओळखली, कदाचित तेव्हा मला स्वत:ला याबाबत माहीत नव्हतं.
दीपिका म्हणाली की, इतक्या लोकप्रिय स्टारकडून मिळालेल्या प्रोत्साहनाला ती नेहमी लक्षात राहील. दीपिकाला आशा आहे की, एक दिवस ती नक्कीच सलमान खानसोबत काम करेल. दीपिका सलमान खानसोबत अनेकदा बिग बॉसमध्ये दिसली. जिथे दीपिका आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी गेली होती.