भररस्त्यात छेड काढणाऱ्याच्या दीपिका पादुकोणने श्रीमुखात भडकावली!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2018 03:52 PM2018-02-01T15:52:56+5:302018-02-01T21:26:56+5:30
बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण सध्या तिच्या ‘पद्मावत’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिने राणी पद्मावतीची दमदार भूमिका साकारली ...
ब लिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण सध्या तिच्या ‘पद्मावत’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिने राणी पद्मावतीची दमदार भूमिका साकारली आहे. सध्या दीपिकाच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत असतानाच बॉलिवूडमध्ये तीच अव्वलस्थानास पात्र आहे हेही तिने दाखवून दिले आहे. वास्तविक तिच्या या चित्रपटामुळे तिला अनेक वादांना आणि टीकांना सामोरे जावे लागले. मात्र अशाही स्थितीत तिने अतिशय धाडसाने चित्रपटाचे दमदार प्रमोशन केले. सध्या दीपिकाचा हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई करीत आहे. असो, आज आम्ही दीपिकासोबत घडलेला एक किस्सा तुम्हाला सांगणार आहोत. अर्थात दीपिकानेच त्याबाबतचा खुलासा केला आहे.
फिल्मफेअर मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत दीपिकाने याबाबतचा खुलासा केला. दीपिकाने म्हटले की, ‘मी आणि माझे कुटुंबीय एकदा रेस्टॉरंटमधून परतत होतो. तेव्हा मी १४-१५ वर्षांची होती. आम्ही रस्त्यावरून चालत होतो. माझे वडील आणि बहीण पुढे चालत होते, तर आई आणि मी मागून चालत होते. तेव्हा एका माणसाने मला मागून स्पर्श केला. त्यामुळे माझा भयंकर संताप झाला. वास्तविक मी गप्प राहू शकत होते अन् काहीच घडले नाही असे दाखवू शकत होते, पण मी तसे केले नाही. मी मागे वळले. त्या व्यक्तीकडे गेली अन् त्याची कॉलर पकडून भररस्त्यात त्याच्या कानशिलात भडकावली. माझे हे रूप बघून आई-वडील चकीत झाले. मात्र त्याचबरोबर मी स्वत:ची काळजी घेऊ शकते हेही त्यांच्या लक्षात आले.
ALSO READ : दीपिका पादुकोणने शेअर केला नवा फोटो; चाहत्यांनी म्हटले, ‘नाकाला काय झाले?’
असो, दीपिकाचा हा निर्भिडपणा खरोखरच कौतुकास्पद म्हणावा लागेल. वास्तविक ‘पद्मावत’ या चित्रपटावेळीही दीपिकाने तिच्यातील धाडस दाखवून दिले. कारण यावेळी करणी सेनेने तिला जिवे मारण्यापर्यंत धमक्या दिल्या. परंतु अशातही दीपिकाने आपली बाजू ठामपणे लावून धरली. त्याचाच प्रत्यय म्हणून हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर तुफान कमाई करीत आहे. आतापर्यंत चित्रपटाने २०१.५० कोटींची कमाई केली, तर परदेशात कमाईचा आकडा १०६.५० कोटींवर पोहोचला आहे.