गहराइयांमध्ये दीपिकासोबत झळकलीये तिची सख्खी बहिणी; तुम्ही ओळखलं का तिला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 14:21 IST2022-02-13T14:20:40+5:302022-02-13T14:21:26+5:30
Gehraiyaan: 'गहराइंया' या चित्रपटात दीपिकासोबत सिद्धांत चतुर्वेदी, धैर्य करवा आणि अनन्या पांडे यांनी स्क्रीन शेअर केली आहे.

गहराइयांमध्ये दीपिकासोबत झळकलीये तिची सख्खी बहिणी; तुम्ही ओळखलं का तिला?
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हिची मुख्य भूमिका असलेला 'गहराइंया' (Gehraiyaan) हा चित्रपट अलिकडेच ओटीटीवर रिलीज झाला. गुंतागुंतीच्या नात्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. त्यातच या चित्रपटात दीपिकासोबत तिच्या सख्ख्या बहिणीनेदेखील काम केल्याचं म्हटलं जात आहे.
'गहराइंया' प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटातील दीपिका आणि सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) यांच्यातील बोल्ड सीनची प्रचंड चर्चा झाली. यामध्येच या चित्रपटात दीपिकाची बहीण अनिशादेखील झळकल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या सोशल मीडियावर या चित्रपटातील अनिशाची भूमिका असलेला स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे.
खरंच दीपिकाच्या बहिणीने केलंय गहराइंयामध्ये काम?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो एका नेटकऱ्याने शेअर केला आहे. या फोटोमध्ये गहराइंयामध्ये दीपिकाची बहीण अनिशा दिसून येत आहे. त्यामुळे या चित्रपटात अनिशाला घेण्याची आयडिया शकुन बत्रा यांची होती की दीपिकाची असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. परंतु, या फोटोमागील सत्य अद्यापही उलगडलेलं नाही. त्यामुळे ती खरंच अनिशा आहे की हा फोटो एडिट केला आहे हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
दरम्यान, 'गहराइंया' हा चित्रपट ११ फेब्रुवारीला अॅमेझॉन प्राइमवर रिलीज झाला. या चित्रपटात दीपिकासोबत सिद्धांत चतुर्वेदी, धैर्य करवा आणि अनन्या पांडे यांनी स्क्रीन शेअर केली आहे.