प्रेग्नंन्सीमुळे दीपिका पादुकोणचा 'कल्कि 2898 AD'च्या सीक्वलमधून पत्ता कट? रिप्लेस होणार अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 12:12 PM2024-07-12T12:12:43+5:302024-07-12T12:13:22+5:30

Kalki 2898 AD : 'कल्कि 2898 AD'च्या सीक्वलमधून दीपिका पादुकोणचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा रंगली आहे. प्रेग्नन्सी आणि मॅटर्निटी लीव्हमुळे दीपिकाऐवजी कोणीतरी दुसरी अभिनेत्री दिसण्याची शक्यता आहे.

deepika padukone to replace from kalki 2898 ad sequel because of maternity leave report | प्रेग्नंन्सीमुळे दीपिका पादुकोणचा 'कल्कि 2898 AD'च्या सीक्वलमधून पत्ता कट? रिप्लेस होणार अभिनेत्री

प्रेग्नंन्सीमुळे दीपिका पादुकोणचा 'कल्कि 2898 AD'च्या सीक्वलमधून पत्ता कट? रिप्लेस होणार अभिनेत्री

'कल्कि 2898 AD' या बिग बजेट बॉलिवूड सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरही तगडी कमाई करत आहे. अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, प्रभास मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमाची सीक्वलची चर्चाही रंगली आहे. 'कल्कि 2898 AD' सिनेमानंतर आता प्रेक्षकांना या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता आहे. या सिनेमाला मिळालेल्या यशानंतर आता मेकर्स लवकरच सिनेमाचा दुसरा भाग आणण्याच्या तयारीत आहेत. 

नाग अश्विन यांनी 'कल्कि 2898 AD' सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या बिग बजेट सिनेमामुळे नाग अश्विन सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक असलेल्या राजामौली, करण जोहर, संजय लीला भन्साळी यांच्या पंगतीत जाऊन बसले आहेत. त्यामुळे आता 'कल्कि 2898 AD' सीक्वलसाठी त्यांच्याकडून चाहत्यांना अपेक्षा आहेत. त्यामुळे या सिनेमाचा पुढचा भाग लवकर प्रदर्शित करण्याची शक्यता आहे. यासाठी सिनेमात काही बदल आणि कलाकारांना रिप्लेस केली जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

'कल्कि 2898 AD'च्या सीक्वलमधून दीपिका पादुकोणचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा रंगली आहे. प्रेग्नन्सी आणि मॅटर्निटी लीव्हमुळे दीपिकाऐवजी कोणीतरी दुसरी अभिनेत्री दिसण्याची शक्यता आहे. "आता तरी याबाबत काहीच सांगता येणार आहे. दीपिकाच्या मॅटर्निटी लीव्हपर्यंत थांबण्यासाठी मेकर्स तयार असल्याचंही कळत आहे. पण, या सिनेमाच्या सीक्वलची मागणी होत आहे. त्यामुळे कदाचित अभिनेत्रीला रिप्लेसही केलं जाऊ शकतं", अशी माहिती सूत्राने दिली आहे. 

दरम्यान, 'कल्कि 2898 AD' सिनेमाने आत्तापर्यंत बॉक्स ऑफिसवर ५४३.४५ कोटींचा गल्ला जमवला आहे. या सिनेमाच्या सीक्वलमध्ये अमिताभ बच्चन, प्रभास, कमल हसन हे कलाकार दिसतील. पण, दीपिकाला रिप्लेस केलं जाण्याच्या चर्चांमुळे चाहते नाराज आहेत. 

Web Title: deepika padukone to replace from kalki 2898 ad sequel because of maternity leave report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.