JNUमध्ये जाण्यासाठी दीपिका पादुकोणने घेतले 5 कोटी? भडकले नेटकरी, केली अटकेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 12:50 PM2020-07-29T12:50:27+5:302020-07-29T12:51:22+5:30

दीपिकाचा ‘ जेएनयू वाद’ पुन्हा एकदा ताजा झाला आहे. सोशल मीडियावर दीपिकाला ताबडतोब अटक करण्याची मागणी होत आहे.

Deepika Padukone trends on social media after ex-RAW agent NK Sood alleges that she took Rs 5 crore to support JNU students | JNUमध्ये जाण्यासाठी दीपिका पादुकोणने घेतले 5 कोटी? भडकले नेटकरी, केली अटकेची मागणी

JNUमध्ये जाण्यासाठी दीपिका पादुकोणने घेतले 5 कोटी? भडकले नेटकरी, केली अटकेची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देसूद यांच्या या आरोपानंतर सोशल मीडियावर दीपिकाविरोधात संताप पाहायला मिळतो आहे.

जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर देशभरात ठिकठिकाणी निदर्शने झाली होती. याचदरम्यान अभिनेत्री दीपिका पादुकोण जेएनयूमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी पोहोचली आणि सगळीकडे खळबळ माजली होती. दीपिकाच्या जेएनयू भेटीनंतर अनेकांनी तिच्या ‘छपाक’ या सिनेमावर बहिष्कार टाकण्याची भाषा केली होती. सोशल मीडियावर दीपिकावर नको इतकी टीका झाली होती. आता दीपिकाचा ‘ जेएनयू वाद’ पुन्हा एकदा ताजा झाला आहे. सोशल मीडियावर दीपिकाला ताबडतोब अटक करण्याची मागणी होत आहे. काहींनी तर दीपिकाला थेट ‘अतिरेकी’ म्हटले आहे. दीपिकाचा जेएनयू वाद पुन्हा भडकण्याचे कारण आहे माजी रॉ अधिकारी एनके सूद यांचा आरोप.

काय आहे आरोप
दीपिकाच्या जेएनयू वादाने पुन्हा एकदा डोके वर काढण्यामागे कारण आहे, माजी रॉ अधिकारी एनके सूद यांचा  आरोप. होय, जेएनयू वादात सामील होण्यासाठी दीपिकाने 5 कोटी रूपये घेतले होते. पाकिस्तानी एजंट अनील मुसरतने दीपिकाला हे पैसे दिले होते, असा आरोप एनके सूद यांनी केला आहे. मुसरत पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांचा अतिशय जवळचा आहे. मुसरतने इम्रान यांच्या कॅन्सर रूग्णालयात गुंतवणूक केली. शिवाय त्यांच्या पक्षालाही फंडींग केले असल्याचा दावा सूद यांनी केला आहे. 2017 मध्ये मुसरतच्या मुलीचे लग्न झाले. या लग्नाला बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी हजर होते. अनिल कपूर, करण जोहर, रणवीर सिंग, सोनम कपूर, हृतिक रोशन अशा बड्या स्टार्सनी या लग्नाला हजेरी लावली होती. अनिल कपूर व मुसरत यांचे 25 वर्षांपासून कौटुंबिक नातेसंबध आहे. सोनम कपूरच्या लग्नातही मूसरत आला होता. याच मुसरतच्या म्हणण्यावरून दीपिका जेएनयूमध्ये गेली होती, असे सूद यांनी म्हटले आहे. अर्थात त्यांच्या या आरोपांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.  

ट्वीटरवर ट्रेंड करतेय दीपिका
सूद यांच्या या आरोपानंतर सोशल मीडियावर दीपिकाविरोधात संताप पाहायला मिळतो आहे. दीपिकाला टॅग करत लोक तिच्याविरोधात टिष्ट्वट करत आहेत. अनेकांनी तिला अटक करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Deepika Padukone trends on social media after ex-RAW agent NK Sood alleges that she took Rs 5 crore to support JNU students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.