दीपिकाने सलमानसोबत एकही सिनेमा केला नाही...; कारण आहे एक ‘ट्रॅजिडी’!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 12:00 PM2022-12-27T12:00:10+5:302022-12-27T12:03:30+5:30
Deepika Padukone, Salman Khan : दीपिका बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांसोबत स्क्रिन शेअर करताना दिसली. पण सलमान खानसोबत तिची जोडी अनेकदा बनता बनता राहिली....
दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या ‘पठाण’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. तिचा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटाच्या निमित्ताने दीपिका पुन्हा एकदा बॉलिवूडचा ‘किंगखान’ शाहरूख खान याच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. खरं तर दीपिका आत्तापर्यंत बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांसोबत स्क्रिन शेअर करताना दिसली आहे. पण सलमान खानसोबत (Salman Khan) तिची जोडी अनेकदा बनता बनता राहिली. दीपिकाने स्वत: भाईजानचे अनेक सिनेमे नाकारलेत. का? तर याचं कारण स्वत: दीपिकाने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
ऐकून आश्चर्य वाटेल पण दीपिकाला सिनेमाची पहिली ऑफर देणारा सलमान खान होता. दीपिकाची प्रतीभा सर्वप्रथम त्यानेच ओळखली होती. पण तेव्हा अभिनेत्री बनण्याचा विचारही दीपिकाच्या मनात नव्हता. यावर दीपिका बोलली होती. ती म्हणाली होती, ‘सलमान व माझ्यात खूप चांगली मैत्री आहे. पण मी आत्तापर्यंत कधीच त्याच्यासोबत काम करू शकले नाही, यामागे एक ट्रॅजिडी आहे. होय, मी मॉडेलिंगमध्ये असताना कुणीतरी माझ्याबद्दल सलमानला सांगितलं होतं. यानंतर सलमानने मला एक सिनेमा ऑफर केला होता. पण मी तेव्हा मला अभिनेत्री बनण्यात काहीही इंटरेस्ट नव्हता. म्हणून मी त्याचा सिनेमा नाकारला. याच्या 2 वर्षानंतर मला ओम शांती ओम ऑफर झाला आणि मी इंडस्ट्रीत आले. पण सलमानसोबत काम करण्याचा योग मात्र अद्याप तरी जुळून आलेला नाही.’
‘ओम शांती ओम’नंतर दीपिकाने कधीच मागे वळून बघितलं नाही. तिला एकापाठोपाठ एक सिनेमे करत गेली. पण सलमानचा सिनेमा करायचा राहून गेला. कारण ती त्यावेळी अभिनेत्री बनायच्या मूडमध्ये नव्हती. रिपोर्टनुसार, दीपिकाने सलमानसोबतचे एक दोन नव्हे तर अनेक सिनेमे नाकारले. जय हो, किक, बजरंगी भाईजान असे अनेक सिनेमे तिने धुडकावून लावले. आता का? हे दीपिकाच ठाऊक़