ऐकावं ते नवल! दीपिका पादुकोणला एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरला चक्क गिफ्ट करायचं होतं कंडोम?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 03:41 PM2021-12-21T15:41:56+5:302021-12-21T15:58:33+5:30

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) त्याच्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत असतो. त्याने दीपिका पदुकोण(Deepika Padukone)सह बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींना डेट केले आहे.

Deepika padukone wanted to gift condom to her ex boyfriend ranbir kapoor | ऐकावं ते नवल! दीपिका पादुकोणला एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरला चक्क गिफ्ट करायचं होतं कंडोम?

ऐकावं ते नवल! दीपिका पादुकोणला एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरला चक्क गिफ्ट करायचं होतं कंडोम?

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor)  त्याच्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत असतो. त्याने दीपिका पदुकोण(Deepika Padukone)सह बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींना डेट केले आहे. दीपिकाचं रणबीरवर ऐवढं  प्रेमात होती की तिने तिच्या मानेवर अभिनेत्याच्या नावाचा टॅटू देखील काढला होता. पण कालांतराने हे नातं तुटलं आणि त्यांचे मार्ग कायमचे वेगळे झाले.

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) दीपिका पादुकोण (Deepika Padukone)मध्ये आज भलेही चांगली मैत्री असली तरी, एक वेळ अशी आली की ब्रेकअपनंतर ही जोडी एकमेकांपासून लांब रहायचे. रणबीर कपूरचे दीपिका पदुकोणसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दोघांनीही मीडियामध्ये एकमेकांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.

दीपिका पादुकोण काही वर्षांपूर्वी करण जोहरच्या चॅट शोमध्ये गेली होती. त्यावेळी तिने पर्सनल लाइफ व रिलेशनशीपबद्दल सांगितले होते. त्यावेळी तिने रणबीर कपूरबद्दलही खुलासा केला होता.

या शोमध्ये जेव्हा करण जोहरने दीपिकाला प्रश्न केला होता की रणबीर कपूरला गिफ्ट काय देशील? त्यावर दीपिका म्हणाली होती की, मी रणबीर कपूरला एक कंडोमचे पाकिट गिफ्ट देऊन कारण त्याचा तो जास्त वापर करतो. यासोबतच दीपिका हेही म्हणाली होती की, रणबीरने कोणत्यातरी कंडोमच्या जाहीरातीतदेखील काम केले पाहिजे.

रणबीरचं उत्तर 
रणबीर कपूर जेव्हा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या या शोचा भाग बनला तेव्हा त्याने त्याच्या एक्स दीपिका पदुकोणबद्दल असे काही बोलले होते की त्याची बहीण करीना कपूर देखील हैराण झाली होती. दीपिकाच्या कंडोमच्या उत्तरावर रणबीरने उत्तर दिले होते. रॅपिड फास्ट राउंड दरम्यान, करण जोहर करिना आणि रणबीरला झटपट प्रश्न विचारत होता, त्या दरम्यान करण जोहरने रणबीरला एक प्रश्न विचारला की त्याच्यासाठी सर्वात वाईट मुलगी कोण आहे? यावर अभिनेत्याने पहिले नाव दीपिका पदुकोणचे घेतले. तर दुसऱ्या क्रमांकावर सोनम कपूर होते.
 

Web Title: Deepika padukone wanted to gift condom to her ex boyfriend ranbir kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.