ना ऐश्वर्या, ना सुश्मिता सेन जगातील सुंदर महिला होण्याचा बहुमान पटावला होता दीपिका पादुकोणने
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 18:54 IST2020-06-12T18:49:10+5:302020-06-12T18:54:41+5:30
तिने जगातील सर्वात सुंदर महिलांच्या यादीत वरचं स्थान पटकावलं होते.

ना ऐश्वर्या, ना सुश्मिता सेन जगातील सुंदर महिला होण्याचा बहुमान पटावला होता दीपिका पादुकोणने
आपल्या अभिनयाच्या जोरावर दीपिका पादुकोणने रसिकांच्या मनात तिने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.2019मध्ये तर तिने जगातील सर्वात सुंदर महिलांच्या यादीत वरचं स्थान पटकावलं आहे. दीपिकासोबतच स्कारलेट जॉनसन, एंजोलिना जॉली, ब्लेक लाइवली, हाले बेरी, बेयोंसे, एम्मा वॉटसन यांची नावं ही या यादीत सामील आहेत.
2019मध्ये झालेल्या मेट गालामध्ये दीपिकाच्या कपड्यां इतकीचे तिच्या सौंदर्याची चर्चा झाली. दीपिका सध्या पती रणवीर सिंगसोबत लॉकडाऊनमध्ये क्वॉलिट टाईम स्पेंट करतो आहे. सोशल मीडियावर ती बरीच सक्रिय असते. आपले फोटो ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.
काही महिन्यांपूर्वी दीपिका तिच्या ‘महानती’ सिनेमातील मानधनामुळे चर्चेत आली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक नाग अश्विन यांना एका प्रोजेक्टमध्ये दीपिकाला प्रभासच्या अपोझिट कास्ट करण्याची इच्छा आहे. पण तूर्तास दीपिकाने या प्रोजेक्टसाठी मागितलेला मानधनाचा आकडा पाहून त्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली होती अशी चर्चा रंगली होती.निर्माता अश्विनी दत्त हा सिनेमा प्रोड्यूस करत आहेत. या बिग बजेट सिनेमाचे शूटींग पुढील वर्षी सुरु होणार आहे. दीपिका या चित्रपटात दिसली तर प्रभास व तिची जोडी प्रेक्षकांसाठी एक खास ट्रिट असणार आहे.