रणवीर शिवाय डिनरला गेली दीपिका पादुकोण, अभिनेत्रीच्या बेबी बंपपेक्षा केअर टेकरने वेधलं सर्वांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 04:08 PM2024-06-01T16:08:14+5:302024-06-01T16:08:55+5:30

Deepika Padukone : बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. दरम्यान, अभिनेत्रीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये तिच्यासोबत दिसणारी मुलगी लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

Deepika Padukone went to dinner without Ranveer, the care taker grabbed everyone's attention rather than the actress's baby bump | रणवीर शिवाय डिनरला गेली दीपिका पादुकोण, अभिनेत्रीच्या बेबी बंपपेक्षा केअर टेकरने वेधलं सर्वांचं लक्ष

रणवीर शिवाय डिनरला गेली दीपिका पादुकोण, अभिनेत्रीच्या बेबी बंपपेक्षा केअर टेकरने वेधलं सर्वांचं लक्ष

अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) काही महिन्यांतच आई होणार आहे. अभिनेत्रीसोबत तिचे चाहतेही तिच्या बाळाची आतुरतेने वाट पाहत आहेत. फेब्रुवारीच्या शेवटच्या महिन्यात या जोडप्याने ही आनंदाची बातमी त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली होती. दीपिका पादुकोण या वर्षी सप्टेंबरमध्ये बाळाला जन्म देणार आहे. काही दिवसांपूर्वी या अभिनेत्रीचा फोटो समोर आला होता, ज्यामध्ये तिचा बेबी बंप दिसत होता. यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव झाला होता. नुकतीच अभिनेत्री तिच्या कुटुंबासोबत डिनरसाठी गेली होती. यावेळी रणवीर सिंग सोबत नव्हता. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. मात्र यावेळी तिच्या बेबी बंपपेक्षा सोबत असलेल्या केअर टेकरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या दुसऱ्या प्री-वेडिंगला हजेरी लावण्यासाठी रणवीर सिंग रवाना झाला आहे. त्याचवेळी दीपिका यावेळी कार्यक्रमाला उपस्थित राहू शकली नाही. दरम्यान तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती कुटुंबातील सदस्य आणि केअरटेकरसोबत रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहे. त्यांच्यासोबत एक मुलगीही दिसत आहे, जी दीपिकाची बॅग सांभाळताना दिसत आहे. त्या मुलीवरून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी दीपिकाला ट्रोल करायला सुरूवात केली.

व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी केलं ट्रोल
दीपिकाचा हा व्हिडिओ पाहून लोकांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. कोणी अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तर कोणी तिच्यासोबत दिसलेल्या मुलीवर कमेंट केली. एका युजरने लिहिले की, 'ती प्रेग्नंट दिसत नाहीये.' दुसऱ्याने लिहिले, 'बॅग घेऊन जाणाऱ्या घरगुती मदतनीसचे वाईट वाटते. दीपिका वयस्कर मदतनीस ठेवू शकत नाही?

वर्कफ्रंट
दीपिकाच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल सांगायचे झाले तर तिच्याकडे 'कल्की 2898 एडी' आणि 'सिंघम अगेन' हे चित्रपट आहेत.

Web Title: Deepika Padukone went to dinner without Ranveer, the care taker grabbed everyone's attention rather than the actress's baby bump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.