दीपिका पादुकोण करणार या गोष्टींचा लिलाव, जमलेला निधी देणार सामाजिक संस्थेला 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 07:52 PM2020-08-28T19:52:18+5:302020-08-28T19:52:48+5:30

दीपिका पादुकोणच्या लिलावातील गोष्टी चाहत्यांनाही विकत घेता येणार आहेत.

Deepika Padukone will auction the items and donate the collected funds to the social organization | दीपिका पादुकोण करणार या गोष्टींचा लिलाव, जमलेला निधी देणार सामाजिक संस्थेला 

दीपिका पादुकोण करणार या गोष्टींचा लिलाव, जमलेला निधी देणार सामाजिक संस्थेला 

googlenewsNext

बॉलिवूडची मस्तानी म्हणजेच अभिनेत्री दीपिका पादुकोण तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आली होती. ती लवकरच प्रभास सोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. मात्र आता एका कामगिरीमुळे ती चर्चेत आली आहे. 29 ऑगस्ट म्हणजेच राष्ट्रीय खेळ दिनाचे औचित्य साधून दीपिका तिचे स्पेशल खेळाशी निगडीत वस्तूंचा लिलाव करणार आहे. यातून जमा होणारा निधी तिच्या 'द लाईव्ह लव्ह लाफ फाऊंडेशन' या मानसिक आरोग्यासाठी काम करणाऱ्या संस्थेसाठी देण्यात येणार आहे. ही घोषणा तिने सोशल मीडियावर केली आहे. तसेच यावेळी तिने तिच्या स्पोर्ट्सवेअरचे फोटोदेखील यावेळी शेअर केले आहेत.

हा संग्रहाचे अनावरण राष्ट्रीय खेळ दिवसाचे औचित्य साधून करण्यात येणार असून यामध्ये दीपिकाच्या वैयक्तिक संग्रहातून निवडक कपडे तसेच, खेळाचे कपडे, खेळ साधने यांचा समावेश असणार आहेत. स्टेपल टीजपासून परफॉरमन्स ओप्टीमायझिंग वर्कआउट साधनांपर्यंत सर्व काही या 'स्पोर्ट्स एडिट' संग्रह, ही चाहत्यांसाठी एक मोठी ट्रीट असणार आहे. या संग्रहामध्ये काही लिमिटेड एडिशन स्नीकर्स देखील आहेत, ज्यावर चाहत्यांच्या अक्षरशः उड्या पडतील.  या कलेक्शनमध्ये बाजारात सर्वाधिक मागणी असलेला एक विशेष पीस ऑल हॉलो ईव’ पेअर देखील असणार आहे.


एक उत्साही फिटनेसप्रेमी आणि खेळांची चाहती असल्यामुळे, दीपिकाने नेहमीच आपल्या चाहत्यांना स्वस्थ आणि निरोगी राहण्यासाठी प्रेरित केले आहे. या संस्करणाच्या निमित्ताने, दीपिका तिच्या चाहत्यांना स्वस्थ जीवन जगण्याचा मार्ग आणि निरोगी आरोग्याकडे बघण्याचा नवा दृष्टिकोण स्वीकारण्यासाठी प्रेरित करणार आहे. 

हे कलेक्शन 29 ऑगस्टपासून DeepikaPadukone.com/Closet वर उपलब्ध होणार आहे.

Web Title: Deepika Padukone will auction the items and donate the collected funds to the social organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.