'पठाण'मध्ये दीपिका पादुकोण दिसणार कधी न पहिलेल्या अवतारात, सिनेमासाठी घेतलेत १५ कोटी रूपये

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 02:55 PM2021-03-03T14:55:38+5:302021-03-03T14:59:09+5:30

Deepika padukone will be seen in the film pathan in new look : आदित्य चोप्राला हा अ‍ॅक्शन सिनेमा इंटरनॅशनल लेव्हलचा करायचा आहे.

Deepika padukone will be seen in the film pathan in a completely new avatar | 'पठाण'मध्ये दीपिका पादुकोण दिसणार कधी न पहिलेल्या अवतारात, सिनेमासाठी घेतलेत १५ कोटी रूपये

'पठाण'मध्ये दीपिका पादुकोण दिसणार कधी न पहिलेल्या अवतारात, सिनेमासाठी घेतलेत १५ कोटी रूपये

googlenewsNext

 दीपिका पादुकोण तिचा मच अवेटेड  अ‍ॅक्शन थ्रिलर सिनेमाचे शूटिंग करते आहे. शाहरुख खानप्रमाणेचदीपिका पादुकोणही पठाण सिनेमात एजंटची भूमिका साकारताना दिसणार आहे. सिनेमातील  दीपिकाच्या लूक आणि कॅरेक्टर स्केचवर एक खास अपडेट मिळाली आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, दीपिका या चित्रपटात स्टायलिश बॉय कट लूकमध्ये दिसेल. 

पठाणमध्ये दीपिका एका एजंटच्या भूमिकेत आहे जी शाहरुख खानसोबत मिशनवर काम करते. या पात्रासाठी अनेक लूकचा विचार केला गेल्यानंतर अखेर  दीपिकाच बॉय कटसाठी (शॉर्ट हेअर) तयार झाली. ज्यानंतर या सिनेमात दीपिका शॉर्ट हेअरमध्ये दिसणार आहे. दीपिकाने 'पठाण' सिनेमातील काही भागांचे आधीच शूट केले आहे. मीड मार्चमध्ये  ती या चित्रपटाचे शूटिंग करणार आहे. पठाणमध्ये प्रेक्षकांमा दीपिका एका नवीन अवतारात दिसणार आहे. यापूर्वी ती अशा लूक आणि भूमिकेत दिसली नव्हती. आपली भूमिका सक्षम करण्यासाठी दीपिका अ‍ॅक्शन सिक्वेन्ससाठीही ट्रेनिंग घेते आहे.


'बॉलिवूड हंगामा'च्या रिपोर्टनुसार, या सिनेमासाठी ती जवळपास १५ कोटी रूपये मानधन घेणार आहे. असे सांगितले जात आहे की, शाहरूख खानचं मानधन बाजूला केलं जर 'पठाण' सिनेमाचं बजेट जवळपास २०० कोटी रूपये असेल. असे सांगितले जात आहे की, आदित्य चोप्राला हा अ‍ॅक्शन सिनेमा इंटरनॅशनल लेव्हलचा करायचा आहे. असे मानले जात आहे की २०२१ च्या दिवाळीत हा सिनेमा रिलीज केला जाऊ शकतो.

Web Title: Deepika padukone will be seen in the film pathan in a completely new avatar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.