मायानगरी मुंबईचा मुसळधार पाऊस बघून दीपिका पादुकोण चिंतित; चाहत्यांना दिला संदेश!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2017 01:24 PM2017-08-29T13:24:26+5:302017-08-29T18:56:02+5:30
मायानगरी मुंबईत सकाळपासूनच पावसाने जोर धरल्याने संपूर्ण मुंबापुरी चिंब झाली आहे. बहुतांश भागात पाणी साचल्याने जागोजागी वाहतुकीची प्रचंड कोंडी ...
म यानगरी मुंबईत सकाळपासूनच पावसाने जोर धरल्याने संपूर्ण मुंबापुरी चिंब झाली आहे. बहुतांश भागात पाणी साचल्याने जागोजागी वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. मुंबईचा मुसळधार पाऊस बघून अभिनेत्री दीपिका पादुकोण चिंतित झाली असून, तिने तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक संदेश दिला आहे. दीपिकाने लिहिले की, ‘कृपया सुरक्षित रहा आणि सर्वांनी काळजी घ्या.’ दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील २४ तास पावसाचा जोर कायम राहणार आहे. २६ जुलै २००५ मध्ये मुंबईत ८४० एमएम पाऊस झाला होता. हा पाऊस त्याचीच आठवण करून देणारा ठरत आहे. दरम्यान, आजच्या पावसाने सर्वत्र दाणादाण उडवून दिली असून, त्याचा फटका सेलिब्रिटींनाही बसला आहे. कारण मुंबई व परिसरात सुरू असलेल्या अनेक चित्रपटांच्या शूटिंग रद्द कराव्या लागल्या. शिवाय मुंबईबाहेर जाण्यास कलाकारांनी टाळले. एकूणच या पावसात घराबाहेर पडणे सगळ्यांनाच अवघड होत आहे. अशात दीपिकाने तिच्या चाहत्यांना खबरदारी घ्यावी, असा संदेश दिला आहे. दीपिकाने हे ट्विट करताच तिच्या चाहत्यांनी तिला प्रतिसाद देत ‘तूदेखील काळजी घे’ असा सल्ला दिला आहे. -- Deepika Padukone (@deepikapadukone), August 29, 2017 While I do this,alerts showing up on my phone about the rains in Mumbai.Please stay safe and take care everyone. दरम्यान, दीपिका लवकरच ‘पद्मावती’ या चित्रपटात बघावयास मिळणार आहे. चित्रपटात ती राणी पद्मावतीची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन संजय लीला भन्साळी करीत आहेत. चित्रपटात दीपिकासोबत रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. राणी पद्मावती यांची भूमिका दमदार व्हावी याकरिता दीपिकाने तिच्या लूकवर प्रचंड मेहनत घेतली आहे. अजूनही चित्रपटाचे काही सीन्स शूट करणे शिल्लक असून, दीपिका त्याबाबतची तयारी करीत आहे. चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट या चित्रपटाविषयी उत्साहित आहे. या चित्रपटाबरोबर दीपिका तिचा कथित बॉयफ्रेंड रणवीर सिंग याच्यामुळेदेखील चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती की, रणवीर आणि दीपिकाचे ब्रेकअप झाले आहे. मात्र त्यानंतर हे दोघे मुकेश अंबानी यांच्या घरी आयोजित केलेल्या गणेश चतुर्थी कार्यक्रमात जोडीने उपस्थित राहिले. त्यामुळे दोघांमध्ये नेमके काय सुरू आहे? असा प्रश्न सध्या त्यांच्या चाहत्यांना भेडसावत आहे.