छपाक प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी टेन्शनमध्ये आली दीपिका, हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 05:17 PM2020-01-11T17:17:46+5:302020-01-11T17:18:35+5:30

छपाक हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दीपिका चांगलीच टेन्शनमध्ये आली आहे.

Deepika Padukone's Chhapaak leaked online by Tamilrockers | छपाक प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी टेन्शनमध्ये आली दीपिका, हे आहे कारण

छपाक प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी टेन्शनमध्ये आली दीपिका, हे आहे कारण

googlenewsNext
ठळक मुद्देचित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच हा चित्रपट ऑनलाइन लीक झाला आहे. तामीळ रॉकर्सने हा चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी लीक केला आहे. 

दीपिका पादुकोण गेल्या कित्येक महिन्यांपासून तिच्या छपाक या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत असण्यासोबतच या चित्रपटाची निर्माती देखील दीपिकाच आहे. हा चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तिने चांगलीच मेहनत घेतली आहे. हा चित्रपट कालच प्रदर्शित झाला असून समीक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला आहे.

छपाक या चित्रपटाला समीक्षकांनी डोक्यावर घेण्यासोबतच या चित्रपटाला प्रेक्षकांचे देखील चांगलेच प्रेम मिळाले आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर खूपच चांगली कमाई केली आहे. पण आता हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दीपिका चांगलीच टेन्शनमध्ये आली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच हा चित्रपट ऑनलाइन लीक झाला आहे. तामीळ रॉकर्सने हा चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी लीक केला आहे. 

तामीळ रॉकर्सने पहिल्याच दिवशी चित्रपट ऑनलाइक लीक करण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी देखील मरजावाँ, ड्रीम गर्स, भारत, कबीर सिंह, केसरी यांसारखे चित्रपट देखील ऑनलाईन लीक झाल्याने त्यांना नुकसान सहन करावे लागले होते. 

छपाक या चित्रपटात प्रेक्षकांना लक्ष्मी अग्रवाल या मुलीची कथा पाहायला मिळत आहे. लक्ष्मीच्या खऱ्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित असून लक्ष्मीवर काही वर्षांपूर्वी ॲसिड हल्ला झाला होता. या चित्रपटात दीपिकासोबतच विक्रांत मेस्सी मुख्य भूमिकेत असून या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजारने केले आहे. 

Web Title: Deepika Padukone's Chhapaak leaked online by Tamilrockers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.