वडिलांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अॅवॉर्ड मिळल्यानंतर दीपिका पादुकोणच्या डोळ्यात आले अश्रू, पाहा व्हिडिओ !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 07:44 AM2018-01-30T07:44:51+5:302018-01-30T16:52:48+5:30
सध्या सगळीकडे पद्मावतनंतर दीपिका पादुकोण चांगलीच चर्चेत आली आहे. या चित्रपटाची सक्सेस पार्टीही तिने दिली. नुकतेच झालेल्या एक अॅवॉर्ड फंक्शनमध्ये दीपिका काहीशी भावूक झालेली दिसली.
स ्या सगळीकडे पद्मावतनंतर दीपिका पादुकोण चांगलीच चर्चेत आली आहे. या चित्रपटाची सक्सेस पार्टीही तिने दिली. नुकतेच झालेल्या एक अॅवॉर्ड फंक्शनमध्ये दीपिका काहीशी भावूक झालेली दिसली. या मागचे कारण होते तिचे वडिल प्रकाश पादुकोण. बॅडमिंटन पटू प्रकाश पादुकोण यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले. या अॅवॉर्ड फक्शंनला दीपिका पादुकोण ही उपस्थिती होती. या कार्यक्रमादरम्यान दीपिकाच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले. आपल्या वडिलांचा सन्मान होताना पाहुन दीपिकाला गहिवरुन आले होते.
प्रकाश पादुकोण यांना उपराष्ट्रपती वेंकैया नायडु यांच्या हस्ते हा अॅवॉर्ड देण्यात आला. दीपिकाशिवाय तिची आई आणि बहिणसुद्धा उपस्थित होती. यावेळी प्रकाश पादुकोण म्हणाले, मी कधी पैशांसाठी किंवा कोणत्या अॅवॉर्डसाठी खेळलो नाही मी माझ्या आनंदासाठी खेळलो. यातून मला समाधान मिळते. मला खेळांडूसाठी काही तरी खास करायचे आहे. छोट्या शहारांमधून येणाऱ्या खेळाडूंसाठी देखील मला काही तरी करण्याची इच्छा आहे.
दीपिका ही शालेय जीवनात बॅडमिंटन खेळायची मात्र त्यानंतर ती मॉडलिंगकडे वळली आणि पुढचा इतिहास सगळ्यांना माहितीच आहे. सध्या सगळीकडे दीपिकाच्या पद्मावत चित्रपटातील अभिनयाचे कौतुक सुरु आहे. तिच्यासोबत रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला सुरुवातीपासूनच करणी सेना व इतर राजपूत संघटनांकडून विरोध केला जात होता. मात्र अशाही स्थितीत हा चित्रपट गेल्या २५ जानेवारीला प्रदर्शित झाला. मात्र विरोधाचा सूर अजूनही कायम आहे. पहिल्या चार दिवसांमध्येच चित्रपटाने 100 कोटींचा बिझनेस केला आहे.
ASLO READ : ‘पद्मावत’ वादानंतर दीपिका पादुकोणने घेतला एक मोठा निर्णय! जाणून तुम्हालाही बसेल धक्का!!
गेल्या अनेक दिवसांपासून दीपिकाच्या लग्नाची ही चर्चा आहे. एकत्र काम करता करता रणवीर दीपिका कधी एकमेकांत अडकले, ते कुणालाच कळले नाही. दीर्घकाळापासून या दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा होतेय. पण रणवीर किंवा दीपिका या दोघांनी कधीही अधिकृतपणे हे नाते मान्य केले नाही. मध्यंतरी हे कपल साखरपुडा करणार अशीही खबर आली होती. पण साखरपुड्याची बातमीही खोटी ठरली. मात्र दोघांच्या लग्नाची चर्चा आता चांगलीच जोर धरु लागली आहे.