लग्नानंतर दीपिका पादुकोणचा 'हा' फोटो होतोय व्हायरल, फोटो पाहण्यासाठी क्लिक करा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 13:41 IST2019-01-14T13:34:56+5:302019-01-14T13:41:25+5:30
बॉलिवूडमध्ये गतवर्षात गाजलेल्या लग्नापैकी दीपिका पादुकोण-रणवीर सिंगचे लग्न आहे. १४-१५ नोव्हेंबरला दीपिका व रणवीरने इटलीतील सुप्रिसिद्ध लेक कोमो येथे लग्नगाठ बांधली होती.

लग्नानंतर दीपिका पादुकोणचा 'हा' फोटो होतोय व्हायरल, फोटो पाहण्यासाठी क्लिक करा!
बॉलिवूडमध्ये गतवर्षात गाजलेल्या लग्नापैकी दीपिका पादुकोण-रणवीर सिंगचे लग्न आहे. १४-१५ नोव्हेंबरला दीपिका व रणवीरने इटलीतील सुप्रिसिद्ध लेक कोमो येथे लग्नगाठ बांधली होती. सिंधी आणि कोंकणी अशा दोन्ही पद्धतीने त्यांनी लग्न केले. यानंतर बंगळुरू आणि मुंबईतमध्ये त्यांनी ग्रँड रिसेप्शन दिले.
लग्नानंतर दीपिकाच्या मंगळसूत्राने सगळ्यांचे लक्ष वेधले होते त्यानंतर आता पुन्हा एकदा दीपिकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत यात तिने वर्कआऊटच्या आऊटफिटवर हातात लाल रंगाचा चुडा घातलेला दिसतोय. सध्या तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
दीपिका पादुकोणच्या प्रोफेशनल लाईफबाबत बोलायचे झाले तर रणवीर सिंगचा आगामी चित्रपट '८३'साठी तिला देखील विचारण्यात आल्याची चर्चा सुरू होती.
निर्मात्यांनी या चित्रपटात दीपिका कपिल देवची पत्नी रोमीची भूमिका करण्यासाठी विचारले व निर्मात्यांच्या नुसार दीपिका हे काम एका आठवड्यात पूर्ण करू शकते. मात्र दीपिका पादुकोणच्या जवळच्या सूत्रांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या माहितीनुसार, सध्या दीपिकाची बॉक्स ऑफिसवर असलेल्या ब्रॅण्ड व्हॅल्यूनुसार ती स्पेशल अपियरन्स करू शकणार नाही. दीपिकाने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले असून लक्ष्मी अग्रवालवरील बायोपिक 'छपाक' सिनेमा तयार करणार आहे. 'छपाक' चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करणार आहे. या चित्रपटात दीपिकासोबत अभिनेता विक्रांत मेसी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.