दीपिका पादुकोणकडे विमानतळावर सिक्युरीटी गार्डने मागितले आयडी, मग पुढे काय झाले पाहा या व्हिडिओत...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 05:47 PM2019-06-22T17:47:53+5:302019-06-22T17:48:48+5:30
दीपिकाला नुकतेच मुंबई विमानतळावर पाहाण्यात आले. पण यावेळी घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला आहे.
बॉलिवूड कलाकारांना विमानतळावर सामान्य लोकांसारखेच वागावले जात असेल की त्यांना एकदम व्हिआयपी वागणूक मिळत असेल असा प्रश्न नेहमीच आपल्याला पडलेला असतो. पण नुकत्याच घडलेल्या एका घटनेमुळे बॉलिवूड कलाकारांना देखील एखाद्या सामान्य माणसांप्रमाणे नियमांचे पालन करावे लागते हे सिद्ध झाले आहे. एका बॉलिवूड अभिनेत्रीकडे विमानतळावरील सुरक्षारक्षकाने आयडी प्रुफची मागणी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
दीपिका पादुकोण ही बॉलिवूडमधील आज आघाडीची अभिनेत्री असून तिने एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. तिच्या फॅन्सची संख्या प्रचंड असून तिला ओळखत नाही अशी व्यक्ती भारतात असेल याची शक्यता खूपच कमी आहे. दीपिका छपाक या चित्रपटाचे चित्रीकरण करत होती. पण हे चित्रीकरण आटपून ती ८३ या चित्रपटासाठी लंडनला रवाना झाली होती. या चित्रपटात ती लग्नानंतर पहिल्यांदाच रणवीर सिंगसोबत काम करणार आहे. ८३ या चित्रपटाचे लंडनमधील चित्रीकरण आटपून दीपिका नुकतीत मुंबईत परतली आहे. तिला नुकतेच मुंबई विमानतळावर पाहाण्यात आले. पण यावेळी घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला आहे.
दीपिका विमानतळावर दिसली त्यावेळी तिच्यासोबत तिचे वडील प्रकाश पादुकोण होते. यावेळी ती संपूर्ण काळ्या रंगांच्या कपड्यांमध्ये दिसली. तिने विमानतळाच्या बाहेर उभ्या असलेल्या फोटोग्राफर्सना फोटो काढून दिले आणि ती थेट आता शिरली. पण यावेळी तिथे उभ्या असलेल्या सिक्युरीटी गार्डने तिला मागून हाक मारली.
ही हाक ऐकताच दीपिका क्षणात मागे वळली आणि तुम्हाला आयडी प्रुफ पाहायचे आहे का असे तिने विचारले आणि लगेचच आपले आयडी प्रुफ काढून दाखवले. दीपिकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिच्या या कृतीचे कौतुक होत आहे. पण त्याचसोबत ती सेलिब्रेटी असली तरी तिने आयडी प्रुफ दाखवूनच आत जाणे गरजेचे होते असे काहींचे म्हणणे होते. दीपिकाच्या वागण्याच्या बाबतीत मिश्र प्रतिक्रिया येत असल्या तरी आपले काम चोख बजावणाऱ्या सिक्युरीटी गार्डवर सगळेच स्तुती सुमनं उधळत आहे. या सिक्युरीटी गार्डला सलाम... त्याने आपले कर्तव्य चोख बजावले असे कमेंटच्या माध्यमातून लोक म्हणत आहेत.