ईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर पुन्हा दिसला ‘आरके’ टॅटू!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 02:05 PM2018-12-13T14:05:44+5:302018-12-13T14:07:05+5:30
दीपिका पादुकोण व रणवीर सिंगच्या लग्नानंतर चर्चा रंगली होती ती दीपिकाच्या मानेवरच्या ‘आरके’ टॅटूची. होय, रणवीरशी लग्न केल्यानंतर दीपिकाने मानेवर गोंदवलेला ‘आरके’ टॅटू काढून टाकला, असे मानले गेले होते. याचे कारण म्हणजे, लग्नाच्या व रिसेप्शनच्या एकाही फोटोत दीपिकाच्या मानेवर हा टॅटू दिसला नव्हता.
दीपिका पादुकोण व रणवीर सिंगच्या लग्नानंतर चर्चा रंगली होती ती दीपिकाच्या मानेवरच्या ‘आरके’ टॅटूची. होय, रणवीरशी लग्न केल्यानंतर दीपिकाने मानेवर गोंदवलेला ‘आरके’ टॅटू काढून टाकला, असे मानले गेले होते. याचे कारण म्हणजे, लग्नाच्या व रिसेप्शनच्या एकाही फोटोत दीपिकाच्या मानेवर हा टॅटू दिसला नव्हता. दिलेल्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी बेंगळुरूला रवाना होतानाचे दीपिका व रणवीरचे अनेक फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले होते. यातही दीपिकाच्या मानेवरचा ‘आरके’ टॅटू नव्हता. ते पाहून दीपिकाने ‘आरके’ टॅटू काढून टाकला अशी चर्चा रंगली होती. आता या टॅटूची इतकी चर्चा होण्याचे कारण म्हणजे, हा टॅटू दीपिकाचा एक्स-बॉयफ्रेन्ड रणबीर कपूरची निशानी आहे. रणबीरसोबत रिलेशनशिपमध्ये असताना दीपिकाने रणबीरच्या नावाचा हा टॅटू मानेवर गोंदवला होता. मात्र लग्नानंतर दीपिकाने एक्स-बॉयफ्रेंडच्या नावाचा टॅटू काढून टाकला असे मानले गेले होते. पण थांबा, असे काहीही नाहीये. दीपिकाने हा टॅटू काढलेला नाही. तर तो अजूनही तिच्या मानेवर आहे.
होय, काल अंबानीची लेक ईशा अंबानीच्या लग्नात दीपिका व रणवीर दोघेही जोडीने आलेत. यावेळी दीपिकाच्या मानेवरचा ‘आरके’ टॅटू पुन्हा एकदा दिसला. मग काय पुन्हा एकदा दीपिकाच्या टॅटूची चर्चा रंगली.
दीपिकाने हा टॅटू तात्पुरता मिटवला होता. कायमचा नाही, हेही लगेच लोकांच्या लक्षात आले.
रणवीरआधी दीपिका रणबीरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण रणबीरच्या आयुष्यात कॅटरिना कैफ आली आणि दीपिकासोबत त्याचे ब्रेकअप झाले. तरीही दीपिकाने फङ टॅटू मानेवरुन मिटवला नव्हता. कदाचित पुढेही तो मिटवणारा नाही.