काय सांगता? जुन्या कपड्यांवर दीपिका पादुकोणने खर्च केलेत 10 लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2021 04:35 PM2021-01-04T16:35:53+5:302021-01-04T16:37:16+5:30
‘छपाक’च्या प्रमोशनवेळी घातलेला एक ड्रेस दीपिकानेरिपीट केला आणि अनेकांना कळलेच नाही.
दीपिका पादुकोण सतत चर्चेत असते. याचे कारण काय तर चर्चेत राहण्याची तिने आत्मसात केलेली कला. होय, चित्रपट रिलीज होवो ना होवो, ती सतत चर्चेत असते. अगदी काही नाही तरी तिच्या स्टाईलची, कपड्यांची चर्चा तर होतेच. एअरपोर्ट लूकबद्दल तर विचारू नका. प्रवासातही दीपिका आपल्या स्टाईल स्टेटमेंटची पूर्ण काळजी घेते. स्टायलिश बकल बेल्ट, सन ग्लासेस, महागड्या हँडबॅग असा तिचा लूक असतो. विशेष म्हणजे अनेकदा दीपिका आपला जुना लूक इतक्या शिताफीने अपडेट करते की, पाहणारा ओळखूही शकणार नाही. सोप्या शब्दांत सांगायचे तर जुने कपडे अशा पद्धतीने वापरते की, ते नवे आणि स्टायलिश वाटतात.
आता हेच बघा ना, ‘छपाक’च्या प्रमोशनवेळी घातलेला एक ड्रेस तिने रिपीट केला आणि अनेकांना कळलेही नाही. होय, जारा फॅशन लेबल्सचा सँडी मोनोटोन आऊटफिट दीपिकाने ‘छपाक’च्या प्रमोशनवेळी कॅरी केला होता. याच सेम ड्रेसमध्ये दीपिका अलीकडे रणवीरसोबत दिसली. फरक इतकाच याचेळी तिने या ड्रेसवर ब्राऊन ट्रेंच कोट कॅरी केला होता.
ड्रेस भलेही जुना होतो पण याला स्टायलिश बनवण्यासाठी दीपिकाने लाखो रूपये खर्च केलेत. होय, या ड्रेसवर दीपिकाने घातलेल्या ब्राऊन ट्रेंच कोटची किंमत 4.46 लाख रूपये होती.
यासोबत दीपिकाने कॅरी केलेल्या बॅगची किंमत किती तर 3.39 लाख रूपये होते. हा लूक पूर्ण करण्यासाठी दीपिकाने लेदर बुट्स घातले होते. त्यासाठी तिने 75 हजार रूपये माजेले होते. एकंदर काय तर ड्रेस जुना पण त्याला स्टायलिश लूक देण्यासाठी दीपिकाने एकूण 9.5 लाख रूपये मोजले होते.
‘ओम शांती ओम’वेळी अनेकांनी उडवली होती दीपिका पादुकोणची खिल्ली...!
जुनं सगळं ‘डिलीट’, नवं वर्ष नवी सुरुवात...! दीपिकानं नव्या वर्षात केली पहिली पोस्ट!!
दीपिका पादुकोण आज बॉलिवूडच्या लीडिंग लेडीच्या यादीत अव्वल स्थानी आहे. मॉडेलिंगपासून सुरुवात करणारी दीपिका आज बॉलिवूडची टॉप अॅक्ट्रेस म्हणून ओळखली जाते. अर्थात हा पल्ला गाठण्यासाठी तिला बराच मोठा संघर्ष करावा लागला. अगदी बॉलिवूडमध्ये नवखी असताना तिने लोकांच्या टिंगल-टवाळक्या सहन केला. तिच्या भाषेचीही खिल्ली उडवली गेली.
दीपिकाने ‘ओम शांती ओम’ या सिनेमातून डेब्यू केला होता. 2007 साली रिलीज झालेला हा तिचा पहिला सिनेमा होता.