करवा चौथला पारंपारिक नाही तर हॉट लूकमध्ये दिसली दीपिका पादुकोण, रणवीरही झाला क्लीन बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 03:46 PM2019-10-18T15:46:21+5:302019-10-18T15:56:15+5:30

जिओ मामि मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणने हजेरी लावली होती.

Deepika, Ranveer also appear clean in bold look in Karwa Chauth not traditional | करवा चौथला पारंपारिक नाही तर हॉट लूकमध्ये दिसली दीपिका पादुकोण, रणवीरही झाला क्लीन बोल्ड

करवा चौथला पारंपारिक नाही तर हॉट लूकमध्ये दिसली दीपिका पादुकोण, रणवीरही झाला क्लीन बोल्ड

googlenewsNext

बॉलिवूडची मस्तानी म्हणजेच अभिनेत्री दीपिका पादुकोणने नुकतेच मुंबईत पार पडलेल्या जिओ मामि मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती. करवाचौथच्या दिवशी सगळे पारंपारिक वेशात असताना दीपिका मात्र बोल्ड अंदाजात दिसली. तिचा बोल्ड व ग्लॅमरस अंदाज पाहून फेस्टिव्हलमधील सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळून राहिल्या होत्या. 

या फेस्टिव्हल दरम्यान दीपिका पादुकोणने पिंक आणि काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. तिच्या या लूकची भुरळ फक्त चाहत्यांनाच पडली नाही. तर तिचा नवरा व अभिनेता रणवीर सिंगलाही पडली. दीपिकाने इंस्टाग्रामवर या लूकमधील फोटो शेअर केले होते. या फोटोवर रणवीरने कमेंट केली आहे. तो म्हणाला की, आता बस्स झालं. पुढच्या फ्लाईटने घरी येतोय मी.

तर दीपिकाच्या दुसऱ्या फोटोवर रणवीरने म्हटलं की, उफ्फ ये निखरी त्वचा का राज बता दो

दीपिका पादुकोण जिओ मामि मुंबई फिल्म फेस्टिव्हलची चेअरपर्सनदेखील आहे. तिला २०१८ साली फिल्म फेस्टिव्हलचं चेअरपर्सन बनविलं होतं.

दीपिका २१ व्या जिओ मामि मुंबई फिल्म फेस्टिव्हलच्या उद्घाटनालादेखील उपस्थित होती.

या फेस्टिव्हलला रेड कार्पेटवर दीपिकाशिवाय बऱ्याच सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. 


जिओ मामि मुंबई फिल्म फेस्टिव्हल १७ ते २४ ऑक्टोबरपर्यंत मुंबईत पार पडणार आहे.या महोत्सवात १९० चित्रपट दाखवले जाणार आहेत.

दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती सध्या आगामी चित्रपट छपाकच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. याशिवाय ती रणवीर सिंगसोबत ८३ चित्रपटात झळकणार आहे. 

 

Web Title: Deepika, Ranveer also appear clean in bold look in Karwa Chauth not traditional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.