Deepika Ranveer Wedding: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांना फराह खानने दिले हे खास गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 12:11 PM2018-11-15T12:11:21+5:302018-11-15T12:24:12+5:30

दीपिका आणि रणवीर यांनी गिफ्ट देऊ नका अशी विनंती जरी केली असली तरी त्यांच्या दोघांच्या एका जवळच्या खास मैत्रिणीने त्यांना एक खूप खास गिफ्ट दिले आहे. ही मैत्रीण म्हणजे फराह खान आहे.

Deepika Ranveer Wedding: Deepika Padukone's Mentor, Farah Khan Gives Personalised Gift On Her Wedding With Ranveer Singh | Deepika Ranveer Wedding: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांना फराह खानने दिले हे खास गिफ्ट

Deepika Ranveer Wedding: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांना फराह खानने दिले हे खास गिफ्ट

googlenewsNext
ठळक मुद्देफराहच्याच ओम शांती ओम या चित्रपटाद्वारे दीपिकाने बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती.रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणचे पर्सनलाईझ्ट हँड इम्प्रेशन मॉमेंटो तिने त्या दोघांना बनवून दिले आहे.हे प्रसिद्ध आर्टिस्ट भावना जसराने बनवले असून हे गिफ्ट दीपिकाला आणि रणवीरला खूपच आवडले असल्याचे म्हटले जात आहे.

बॉलिवूडचे पॉवर कपल रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण हे नुकतेच इटलीत लग्नबंधनात अडकले. त्यांनी त्यांच्या जवळच्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत लग्न केले. हे लग्न धुमधडाक्यात पार पडले असून या लग्नात येणाऱ्या कोणत्याही पाहुण्यांनी फोटो अथवा व्हिडिओ काढू नये अशी विनंती दीपिका आणि रणवीर यांच्याकडून करण्यात आली होती. कोंकणी पद्धतीने काल विवाह पार पडल्यानंतर आज त्यांचा विवाह सिंधी पद्धतीने होणार आहे. या विवाहसोहळ्यानंतर ते लवकरच भारतात परतणार असून भारतात आल्यानंतर बंगलूरू आणि मुंबई अशा दोन ठिकाणी ते रिसेप्शन देणार आहेत. मुंबईतील रिसेप्शनला बॉलिवूडमधील अनेकांना निमंत्रणं देण्यात आली आहेत. 

या रिसेप्शनबद्दलची खास बातमी म्हणजे, या रिसेप्शन पार्टीत पाहुण्यांना गिफ्ट न आणण्याची विनंती केली गेली आहे. होय, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या रिसेप्शन कार्डमध्ये पाहुण्यांनी गिफ्ट आणू नये, अशी ठळक विनंती करण्यात आली आहे. यापुढची आणखी एक बातमी म्हणजे, एखादा गेस्ट गिफ्ट देऊ इच्छित असेल तर तो दीपवीरच्या चॅरिटीमध्ये देणगी देऊ शकतो. होय, रणवीर आणि दीपिका गेल्या काही काळापासून एका संस्थेशी जुळलेले आहेत. पाहुण्यांनी आपल्याऐवजी या संस्थेला भेट स्वरूपातील देणगी द्यावी, अशी दीपवीरची इच्छा आहे.

दीपिका आणि रणवीर यांनी गिफ्ट देऊ नका अशी विनंती जरी केली असली तरी त्यांच्या दोघांच्या एका जवळच्या खास मैत्रिणीने त्यांना एक खूप खास गिफ्ट दिले आहे. ही मैत्रीण म्हणजे फराह खान आहे. फराहच्याच ओम शांती ओम या चित्रपटाद्वारे दीपिकाने बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. त्या दोघांचे पर्सनलाईझ्ट हँड इम्प्रेशन मॉमेंटो तिने त्या दोघांना बनवून दिले आहे. हे प्रसिद्ध आर्टिस्ट भावना जसराने बनवले असून हे गिफ्ट दीपिकाला आणि रणवीरला खूपच आवडले असल्याचे म्हटले जात आहे. दीपिकाच्या फॅन क्लबने या गिफ्टचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून या फोटोला तिचे फॅन्स भरभरून लाईक्स देत आहेत. तसेच या फोटोंवर प्रतिक्रिया देत आहेत.

 

Web Title: Deepika Ranveer Wedding: Deepika Padukone's Mentor, Farah Khan Gives Personalised Gift On Her Wedding With Ranveer Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.