Deepika Ranveer Wedding : दीपवीर मुंबईला परतले, विमानतळावरून थेट सासरी रवाना झाली दीपिका!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 10:01 AM2018-11-18T10:01:11+5:302018-11-18T10:01:42+5:30

दीपिका पादुकोण व रणवीर सिंग हे नवदाम्पत्य मुंबईला परतले. होय, १४ व १५ नोव्हेंबरला इटलीत लग्नगाठ बांधल्यानंतर दीपवीर मुंबईला दाखल झालेत.

 Deepika Ranveer Wedding: DeepVeer arrive in Mumbai; head to Bhavnani residence for Griha Pravesh | Deepika Ranveer Wedding : दीपवीर मुंबईला परतले, विमानतळावरून थेट सासरी रवाना झाली दीपिका!

Deepika Ranveer Wedding : दीपवीर मुंबईला परतले, विमानतळावरून थेट सासरी रवाना झाली दीपिका!

googlenewsNext

दीपिका पादुकोणरणवीर सिंग हे नवदाम्पत्य मुंबईला परतले. होय, १४ व १५ नोव्हेंबरला इटलीत लग्नगाठ बांधल्यानंतर दीपवीर मुंबईला दाखल झालेत. यावेळी सगळ्यांच्याच नजरा दीपवीरवर खिळल्या होत्या. मुंबई विमानतळावरून दोघेही थेट रणवीरच्या घराकडे रवाना झाले. बांद्रातील रणवीरच्या घरी दीपिकाचा गृहप्रवेश होणार आहे.

 



इटलीत दीपिका व रणवीरचा शाही लग्नसोहळा झाला. दोघांनीही कोंकणी आणि सिंधी पद्धतीने विवाह केला. दीपिका आणि रणवीरने दोन्ही दिवशी सब्यासाचीने डिझायन केलेले कपडे परिधान केले होते. सिंधी पद्धतीने केलेल्या विवाह सोहळ्याला दीपिकाने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता.  या लेहंग्याची किंमत तब्बल 8.95 लाख इतकी होती.

लग्नाचा एकही फोटो लीक होऊ नये, यासाठी दीपवीर दोघांनीही सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. या सुरक्षेवर सुमारे १ कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला होता. अर्थात याऊपरही काही फोटो लीक झाले होते. पण हे फोटो अस्पष्ट होते. कारण हे फोटो ब-याच दूर अंतरावरून टिपण्यात आले होते. 
लग्नानंतर  दीपवीर भारतात तीन रिसेप्शन देणार आहेत. होय, येत्या २१ नोव्हेंबरला बेंगळुरू येथे दीपवीरच्या लग्नाचे पहिले रिसेप्शन होईल. दीपिकाचे आई-वडिल हे रिसेप्शन होस्ट करतील. यानंतर येत्या २८ नोव्हेंबर आणि १ डिसेंबरला मुंबईच्या ग्रण्ड हयात हॉटेलमध्ये दुसरे व तिसरे रिसेप्शन होणार आहे. २८ तारखेच्या रिसेप्शला केवळ मित्र आणि कुटुंबीय असतील. तर १ डिसेंबरचे रिसेप्शन केवळ बॉलिवूडमधील मित्रपरिवारासाठी असेल.

Web Title:  Deepika Ranveer Wedding: DeepVeer arrive in Mumbai; head to Bhavnani residence for Griha Pravesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.