Deepika Ranveer Wedding : सुपरडुपर हिट! दीपवीरच्या लग्नाच्या फोटोंवर लाईक्सचा पाऊस!!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 08:59 PM2018-11-15T20:59:27+5:302018-11-15T21:01:29+5:30
कालपासून दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहते आसूसले होते. कुणालाही ही अतिशयोक्ती वाटेलही. पण रणवीर व दीपिकाने लग्नाचे फोटो शेअर करताच त्यावर लाईक्सचा पडलेला पाऊस बघून तुम्हीही अवाक् व्हाल.
ठळक मुद्देरणवीर व दीपिकाने लग्नाचे फोटो शेअर करताच त्यावर लाईक्सचा पडलेला पाऊस बघून तुम्हीही अवाक् व्हाल.लोकांनी हे फोटो पाहून दीपवीरला मनापासून शुभेच्छा दिल्या. एका चाहतीने ‘नजर ना लग जाये आपके जोडी को’, अशी मनस्वी प्रतिक्रिया दिली.
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग काल १४ नोव्हेंबरला इटलीतील लेक कोमो येथे एका शाही सोहळ्यात लग्नबंधनात अडकले. आज १५ नोव्हेंबरला दोघांनीही सिंधी पद्धतीने लग्न केले. कालपासून या कपलच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहते आसूसले होते. कुणालाही ही अतिशयोक्ती वाटेलही. पण रणवीर व दीपिकाने लग्नाचे फोटो शेअर करताच त्यावर लाईक्सचा पडलेला पाऊस बघून तुम्हीही अवाक् व्हाल. होय, पहिल्या २० मिनिटांत या फोटोंना सहा लाखांवर लोकांनी लाईक्स केले. यानंतर १५ मिनिटांतच लाईक्सची संख्या १२ लाख २५ हजारांवर पोहोचली.
दीपवीरच्या लग्नाच्या फोटोंवर प्रतिक्रियांचाही पाऊस पडला. लोकांनी हे फोटो पाहून दीपवीरला मनापासून शुभेच्छा दिल्या. एका चाहतीने ‘नजर ना लग जाये आपके जोडी को’, अशी मनस्वी प्रतिक्रिया दिली. अनेकांनी दीपवीरचे अभिनंदन केले़ एका चाहत्याने ‘बेस्ट कपल इन द ईअर’ अशा शब्दांत दीपवीरचे अभिनंदन केले.
एकंदर काय तर वधूच्या पोशाखातील दीपिका आणि वराच्या पोशाखातील रणवीरला पाहून अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. आज संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास दीपवीर यांच्या सिंधी विवाहाच्या लग्नविधी सुरु झाल्यात. लग्नानंतर दीपवीरने इटलीत वेडिंग मेन्यूबाहेर ताटकळत असलेल्या मीडियासाठी मिठाई पाठवली़. रात्री ८ च्या सुमारास दीपवीरने लग्नाचे फोटो शेअर केलेत. लग्नाचा एकही फोटो लीक होऊ नये, यासाठी दीपवीर दोघांनीही सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. या सुरक्षेवर सुमारे १ कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. अर्थात याऊपरही काही फोटो लीक झाले होते. पण हे फोटो अस्पष्ट होते. कारण हे फोटो ब-याच दूर अंतरावरून टिपण्यात आले होते. त्यामुळे चाहत्यांची प्रतीक्षा शिगेला पोहोचली होती.